संविधान दिनानिमित्त अकलूज मध्ये समता रॅली

संविधान दिनानिमित्त अकलूज मध्ये समता रॅली

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अकलूज –बहुजन क्रांती मोर्चा व अकलूज अकलूज शहरातील सर्व समविचारी सामाजिक संघटना यांच्यातर्फे संविधान दिनानिमित्त अकलूज शहरातून संविधान,समता रॅली काढण्यात आली.

बहुजन क्रांती मोर्चा व अकलूज शहरातील सर्व समविचारी संघटना यांच्यातर्फे दिनांक-26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त अकलूज शहरातून संविधानाचा जागर करण्यासाठी,संविधानाची नीती,मुल्य, समाजातील तळागाळातील शेवटच्या घटका पर्यंत लोकांना समजण्यासाठी
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासुन ते अकलूज शहरातील सर्व बहुजन महापुरुष यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून , संविधानाच्या सन्मानात घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ समता रॅलीची सांगता करण्यात आली .यावेळी, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य काकासाहेब जाधव,भारत मुक्ती मोर्च्याचे महा. उपाध्यक्ष नानासाहेब चव्हाण, युवा सेना अकलूज शहर प्रमुख शेखर खिलारे जाधव,
पीआरपी जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले,
आरपीआय युवक तालुका अध्यक्ष विजयभाऊ कोकणे
छत्रपती क्रांती सेना तालुका संयोजक रिकेश चव्हाण
बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष नागेश वाघंबरे
लॉर्ड बुद्धा चॅनेलं चे माळशिरस तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड,प्रहार तालुका अध्यक्ष किरण भांगे, सह सामाजिक संघटनेतील आदी मान्यवर उपस्थित होते.

या समता रॅलीचे आयोजक
सौरभ वाघमारे,शेखर खिलारे,अक्षय जाधव,अविनाश सोनवणे तेजस उबाळे,ऋतिक चव्हाण गीतेश चौगुले,अनिल पवार ,लखन बेन्द्रे सह आदीनी परिश्रम घेतले.

You may have missed