डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व संशोधन केंद्र च्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो आदर्श विद्यार्थी घडतील! – डॉ.कुमार लोंढे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व संशोधन केंद्र च्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो आदर्श विद्यार्थी घडतील!
– डॉ.कुमार लोंढे
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-महामानव,बोधिसत्व,घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोशल या संस्थेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व संशोधन केंद्राची निर्मिती करून आगळी वेगळी आदरांजली अर्पण केली.
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज च्या प्रारंगणात भूमिपूजन करून सेंटर ची सुरुवात करण्यात आली .सुरुवातीस महामानवांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश देठे ( माजी पोलीस निरीक्षक) शाळा समितीचे बाळासो जाडकर,जितेंद्र देठे प्रमुख पाहुणे नानासो वाघम्बरे विश्वस्त डॉ. पंचशीला लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बाळासो जाडकर म्हणाले ” ही शाळा फक्त विद्यार्थी घडवत नाही तर शिस्त व संस्कार ही देत आहे. डॉ.पंचशीला लोंढे म्हणाल्या या सेंटर चे स्वप्न आहे उच्च पदस्थ अधिकारी निर्माण करून संविधान व मानवी मूल्य याची जनजागृती करणे.सुरेश देठे साहेब म्हणाले डॉ.कुमार लोंढे यांचे कार्य आदर्शवत आहे.
सोशल या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉ.कुमार लोंढे मनोगत व्यक्त करताना म्हणाले ” डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व संशोधन केंद्र च्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो आदर्श विदयार्थी घडतील ! संविधान जनजागृती,मूलभूत अधिकार,हक्क व कर्तव्य,राष्ट्रीय आंतराष्ट्रीय परिसंवाद,विज्ञानवादी दृष्टीकोन,अभ्यासिका,उच्च पदस्थ अधिकारी,मार्गदर्शन व शिस्त व शीलवान पिढी घडविणे हाच उद्देश घेऊन सेंटर कार्य करेल!महापुरुष डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही तर डोक्यात घेऊन नाचण्याचा विषय आहे.या सुसज्ज सेंटर च्या निर्मितीसाठी समाजातील परिवर्तनवादी व्यक्तींनी हातभार लावणे महत्वाचे आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कुंडलिक साठे यांनी केले.कार्यक्रमास बाळासो काटे,प्रा.दीपक काटे,प्रा.वायदंडे,गोरड, सरतापे,समाधान खरात,अंकुश देठे इ मान्यवर उपस्थित होते.शेवटी आभार प्रा.विठ्ठल धाइंजे यांनी मानले

You may have missed