गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या मुळे भारतीय जनता पार्टी ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहचली : बाळासाहेब सरगर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज प्रमोद शिंदे प्रतिनिधी: 
     गोपीनाथराव मुंडे साहेबा मुळे भारतीय जनता पार्टी ग्रामीण भागात तळागाळापर्यंत  पोहोचली असल्याचे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी आज माळशिरस येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय माळशिरस येथे जयंतीच्या निमित्ताने  ते बोलत होते .
        या कार्यक्रमाला भाजपा तालुका सरचिटणीस संजय देशमुख मोटेवाडीचे सरपंच दादासाहेब खरात युवानेते युवराज वाघमोडे नगरसेवक आकाश सावंत बालाजी नरळे गणेश सीद तुळशीराम घुले राहूल बंडगर  आदी उपस्थित होते. 
    ते पुढे बोलताना सरगर  म्हणाले की  भारतीय जनता पार्टी ही दोन खासदाराची पार्टी शहरी भागापुरती मर्यादित होती परंतु गोपीनाथराव मुंडे साहेबांमुळे ग्रामीण भागातल्या तळागाळापर्यंत जाऊन आज 302 खासदाराची पार्टी म्हणून देशात एक नंबर ला आहे. म्हणून मुंडे साहेबांचे काम हे आजच्या भाजप कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे आहे .1995 झाली काढलेल्या संघर्षयात्री मुळे महाराष्ट्र राज्यात युतीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा पासून भाजपला राज्यात वैभव प्राप्त झाले त्याचे श्रेय मुंडे साहेबांना जाते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार युवराज वाघमोडे यांनी केले.

You may have missed