महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकलूज येथे काव्य संमेलन – शेखर खिलारे
महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकलूज येथे काव्य संमेलन – शेखर खिलारे
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अकलूज(प्रतिनिधी) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकलूज येथे काव्य संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती युवासेना शहरप्रमुख शेखर खिलारे यांनी दिली.
सदरचे संमेलन दिनांक१३.१२.२०२० रोजी सायंकाळी ४.३०वाजता, सदुभाऊ चौक अकलूज येथील विकास सोसायटी हॉल मध्ये होणार असून श्रीमंत कोकाटे (इतिहास संशोधक) व अमित प्रभा वसंत (पेरलोनी) यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये समाज प्रबोधनात्मक उद्दिष्ट आणि ध्येय ठेवून प्रबोधनात्मक काव्यसंमेलन आयोजित केले आहे.तरी माळशिरस तालुक्यातील सर्व साहित्यिक,कवी,कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शेखर खिलारे यांनी केले आहे.तर आपली कविता सादर करायची असेल तर शेखर राजाभाऊ खिलारे 8390009006 या नंबर वरती संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
या संमेलनाचे निमंत्रित कवि म्हणून नितीन चंदनशिवे (दंगलकार),सागर रामचंद्र काकडे (सातारा) सुमित गुणवंत (पुणे),चंद्रशेखर गायकवाड(अकलूज) रोहित देशमुख (वेळापूर) व युवासेना तालुका प्रमुख गणेश इंगळे यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाचे आयोजन युवासेना व योद्धा प्रतिष्ठान अकलूज यांच्या वतीने करण्यात आले आहे.