माळशिरस तहशील कार्यालय येथे बिलोली येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ लहुजी शक्ती सेना आक्रमक
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरातील झोपडपत्ती मध्ये राहत असलेल्या मातंग समाजाच्या मूकबधिर मुलीवर 27 वर्षीय युवतीवर बलात्कार करून तिचा दगडांनी तोंडावर ठेवून माणुसकीला काळीमा फासणारी घटना दिनांक 09/12/2020 रोजी घडलेली आहे त्या अनुषंगाने लहुजी सेनेचे कार्यकर्ते आक्रमक होऊन माळशिरस येथे निषेध नोंदवण्यात आला व अन्य पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने निवेदनामध्ये बलात्कार केलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावे, पिडीत कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी, पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे अशा विविध मागण्या माळशिरस तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना करण्यात आल्या यावेळी लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख सतीश सपकाळ सोलापूर जिल्हा अध्यक्ष महादेव तुपसौंदर,युवक जिल्हा अध्यक्ष सागर लोखंडे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष अवघडे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन रणदिवे माळशिरस तालुका युवक अध्यक्ष महादेव भिंगारदिवे,तालुका युवक उपाध्यक्ष विकास लोखंडे,माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राहुल रणदिवे,वेळापुर शहराध्यक्ष बजरंग कानगे,पिनु भाऊ एडगे,महेंद्र साठे,शहराध्यक्ष समाधान साठे,,पिंटु वायदंडे,शंकर वायदंडे,पप्पु साठे,आंबादास पाटुळे,भैय्या पाटुळे,अमोल कांबळे, इतर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.