सत्यशोधक विवाहाचे कार्य रघुनाथ ढोक यांनी तेलंगाणा राज्यात प्रथम सुरु केले ही आनंदाची बाब !!! ना. छगन भुजबळ

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे तेलंगाणा राज्यातील पहिला सत्यशोधक विवाह रजिस्टर नोंदणी करून महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने माळी समाजाचे संतोष सोनूले (BA) जिल्हा आदिलाबाद आणि ईश्वरी नागोशे (5वी) जिल्हा आसिफबाद यांचा सत्यशोधक विवाह नुकतेच 7 डिसेंबर 2020 रोजी दु.2.30 वाजता रहाते घरी दुब्बागुडा , आसिफाबाद येथे विधीकर्ते म्हणुन अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले यांचे वेशभुषेत मोफत जाऊन मोफत लावला.
या सत्यशोधक विवाहास शुभेच्छा देताना महाराष्ट्राचे अन्न नागरी पुरवठा व नागरी संरक्षण विभागाचे मंत्री नामदार छगन भुजबळ म्हणाले की महाराष्ट्राचे बाहेर जाऊन तेलंगणा मध्ये प्रथम सत्यशोधक विवाह होत आहे ही आनंदाची बाब आहे. अंधश्रद्धा, कर्मकांड व आर्थिक उधळपट्टी होऊ न देता महापुरुषांचे विचार रुजवून फुले एज्युकेशन च्या माध्यमातून रघुनाथ ढोक यांनी 22 वा मोफत सत्यशोधक विवाह लावला यातून लोक नक्कीच प्रेरणा घेतील असे ही भुजबळ म्हणाले आणि हे कार्य महापुरषांचे विचाराने अखंड राज्यात – परराज्यात चालू ठेवावे अशा मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी यवतमाळचे राजेंद्र महाडोळे यांचे शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट दिली.तर आईवडिलांना व विवाह घडवून आणणारे तसेच मदत केली त्या सर्वांना राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ ,महापुरुषांचे प्रतिमा भेट देऊन मान्यवरांसह स्वागत केले.
याप्रसंगी महात्मा फुले रचित मंगलाष्टके, व कवी डॉ.वडगांवकर , लिखित महात्मा फुले यांचा पोवाडा ,संत सावतामहाराज, संत तुकडोजी महाराज व स्वागत गीत प्रथमच करंजी ,नांदेड च्या श्री गुरुदत्त सेवा मंडळाने स्त्री पुरुष आवाजात गाऊन प्रेरणादायी वातावरण करून लौकीक मिळवला तसेच स्थानिकांनी तेलगू भाषेत महात्मा फुले यांचेवर देखील गाणी गायिली. त्या टीमचे रघुनाथ ढोक यांनी सन्मानपत्र व महात्मा फुले, सावित्रीबाई फुले प्रतिमा भेट देऊन अभिनंदन केले.
प्रथमच होणाऱ्या सत्यशोधक विवाहासाठी महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, कर्नाटक, तेलंगाणा व आंध्र देश या ठिकाणावरून अनेक संस्थाचे प्रतिनिधी, सरपंच तुळशीराम फाटाळे, मंगलाताई रामसिडाम, निवृत्त पोलीस अधिकारी तुकारामजी जीवणे, चंद्रपूरचे सत्यशोधक दिलीप कोटरांगे उपस्थितीत होते.
या कार्यक्रमाचे नियोजनासाठी तेलंगाणा चे अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष सुकुमार पेटकुले आणि माजी न्यायमूर्ती शिवदास महाजन यांनी मदत केली तर सूत्रसंचालन प्रा.सुदाम धाडगे,अमोलभाऊ गुरुनुले यांनी केले. तर मोलाचे सहकार्य देऊळगाव राजाचे माजी नगराध्यक्ष जेष्ठ समाजसेवक तुकाराम खांडेभराड, नांदेड विध्यापीठ चे डॉ.राजाराम माने ,शिवगोविंद कुशावाह व आकाश-क्षितीज ढोक यांनी केले. सुरुवातीला वधूवर यांनी सभामंडपात येताना आपले राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान ,महात्मा फुले समग्र वाड्मय हातात घेऊन फुलाच्या पायघड्यांवरून आगमन केले नंतर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पर्यावरण समतोल राखण्यासाठी ५ झाडाची पूजा करून ती झाडे वाढविण्याचा संकल्प करून त्यांचे हस्ते मुली ,व महिलांना सावित्रीबाई फुले ग्रंथ भेट दिले. यावेळी अक्षता म्हणून फुलांचा वापर केला.

You may have missed