भाजपचे आमदार किसन कोथोरे यांच्या गाडीच्या अपघाताने दुचाकीस्वार जागीच ठार
पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क कल्याण संदेश भालेराव– ठाणे जिल्हा-मुरबाड मतदार संघातील भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्या कारने एका दुचाकी चालकाला जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे , तर एक महिला गंभीर असल्याचे समोर आले आहे. ही घटना मुरबाड तालुक्यातील दहा गाव आपटी रस्त्यावर घडली असुन घटना स्थळी कल्याण पोलिस दाखल झाले असुन
कार मधील जखमी आणि मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव समजू शकले नाही. तर दुचाकी वरील दुसरी महिला गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे मात्र अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू होउन दुचाकी वरील महिला रस्त्याच्या लगत असलेल्या शेतात उडून पडली होती त्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे
