श्री रमण शेठ ढवळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी).- नातेपुते येथील किशोर प्रिंटिंग प्रेस चे मालक किशोर ढवळे यांचे वडील नातेपुते येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्री रमण सेठ कृष्णा ढवळे यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. दुःख निधना वेळी त्यांचे वय 75 वर्ष होते. घरची परिस्थिती हलाखीची असताना परिस्थितीवर मात करत त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून फलटण येथे दुसऱ्यांच्या प्रिंटिंग प्रेस मध्ये काम करत नातेपुते येथे 1968 साल नातेपुते येथील पहिली स्वतःची प्रिंटिंग प्रेस सुरू केली त्यांनी सुरू केलेल्या प्रिंटिंग प्रेस ला आज 53 वर्षे पूर्ण झाले आहेत. लोक त्यांना आवडीने रमण सेठ असे म्हणत सर्वच जाती धर्मातील लोकांचे त्यांचे आपुलकीचे संबंध होते. त्यांचाच वारसा जपत त्यांचे चिरंजीव किशोर ढवळे प्रिंटिंग प्रेस चालवत आहेतत्यांच्या जाण्याने नातेपुते परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा सून चार मुली नातवंडं असा परिवार आहे. पुरोगामी महाराष्ट्र न्यूज भावपूर्ण श्रद्धांजली