बाळासाहेब सरगर यांच्या मुलाचा वाढदिवसाचा खर्च टाळून राम मंदिर उभारणीसाठी दिला निधी.
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत बाळासाहेब सरगर यांनी राम मंदिराच्या बांधकामासाठी निधी देऊन एक वेगळा उपक्रम घालून दिला. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांचा मुलगा राजवीर सरगर याचा तिसरा वाढदिवस आज असल्यामुळे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला खर्च करण्यापेक्षा राम मंदिराच्या बांधकामासाठी निधी देऊन समाजापुढे एक आदर्श ठेवला यामुळे तालुक्यात चांगला संदेश दिला.
हा निधी अॅड माधव बिराजदार यांच्याकडे सुपूर्द केला त्यावेळी त्यांनी पेढा देऊन आशीर्वाद दिले व या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी अॅड मिलिंद कुलकर्णी ओबीसी मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब वावरे माजी तालुकाध्यक्ष सोपान नारनवर सरचिटणीस संजय देशमुख नागेश वाघमोडे नीलेश देशपांडे नितीन मसलेकर संजय हुलगे नागेश होनराव आदी उपस्थित होते.