मुलांच्या लग्नात भारतीय संविधानाचे वाटप… वाशिम,
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वाशिम,-वाशिम जिल्ह्यातील परिवर्तनवादी कार्यकर्ते तथा नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस चे वाशिम जिल्हा सल्लागार आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिम शाखेचे बुवा बाजी विभाग प्रमुख शाहीर दतराव वानखेडे यांनी त्यांच्या मुलाच्या लग्न समारंभात भारतीय संविधानाच्या प्रती भेट देऊन सामाजिक कार्याचा ठसा उमटवत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे व आपल्या कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस चे वाशिम जिल्हा सल्लागार तथा अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिम शाखेचे बुवा बाजी विभाग दतराव वानखेडे यांचा मुलगा विद्यानंद वानखेडे याचा विवाह मंगरूळपीर तालुक्यातील जांब या गावाचे भाऊराव इंगळे यांची मुलगी वैशाली यांच्या सोबत रविवार तारीख सतरा जानेवारी ला जांब मंगरूळपीर येथे एनडीएमजे चे राज्य सहसचिव पी एस खंदारे यांच्या हस्ते संपन्न झाला.
समाजात बुद्ध, शिव, फुले, शाहु आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करून समाजाला दिशा दर्शक म्हणून काम करणारे वाशिम जिल्ह्यातील जेष्ठ मान्यवर मंडळी चे भारतीय संविधान देऊन सत्कार करण्यात आला या मध्ये डा. रामकृष्ण कालापाड, हंसराज शेंडे, शेषराव मेश्राम, बालाजी गंगावणे, भारतीय बौद्ध महासभा डोंबिवली शहर शाखेचे गौतम खंदारे, एनडीएमजे चे वाशिम जिल्हा अध्यक्ष समाधान सावंत,रामदास वानखेडे,कुसुमताई सोनुने, माया खंदारे, भागवत गवई, नारायण सरकटे, महादेव कांबळे,शाहीर लोडजी भगत, शाहीर विश्वनाथ इंगोले, सदाशिव राऊत, प्रकाश अंबेकर, विश्वास कांबळे, संदिप खडसे आमखेडा चे सरपंच जोगदंड आदी मान्यवर मंडळी ला भारतीय संविधान देऊन दतराव वानखेडे यांनी मुलाचा विवाह सोहळा शेकडो लोकांचे उपस्थितीत पार पाडला. एनडीएमजे च्या वतीने उपस्थित कार्यकर्ते यांनी नवदाम्पत्याना शुभेच्छा दिल्या.