कल्याण येथील पत्री पुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न

         

पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क संदेश भालेराव-

कल्याणरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या व कल्याण पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या नव्या पत्री_पुलाचे लोकार्पण
आज मा. मुख्यमंत्री ना.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन पद्धतीने तसेच राज्याचे मा. पर्यावरण, पर्यटन तथा राजशिष्टाचार मंत्री ना.श्री. आदित्यजी ठाकरे साहेब तसेच मा. नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
या लोकार्पण सोहळ्यासमयी मा. नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेत्तृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या पुलाचे बांधकाम पुर्णत्वास नेण्याकरिता अनेक समस्या आणि अडचणींवर मात करत अहोरात्र मेहनत करणारे एमएसआरडीसी विभाग तसेच रेल्वे प्रशासन अधिकारी व कर्मचारी, पोलीस दल, कंत्राटदार आणि कामगार यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले.
कल्याण व डोंबिवली शहरांतर्गत वाहतुकीच्या दृष्टिने अतिशय महत्वाचा असलेला हा पूल नागरिकांकरिता खुला झाल्याने आता पूल परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
याप्रसंगी खासदार कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, आमदार प्रमोद पाटील, आमदार डॉ. बालाजी किणीकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.राधेश्याम मोपलवार, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, रेल्वे प्रशासन तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरीष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते…..

पुुुु

You may have missed