रत्नत्रय शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

रत्नत्रय शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्करत्नत्रय शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. मयुरजी गांधी (माजी अध्यक्ष सन्मती सेवादल) तर प्रमुख पाहुणे म्हणून सन्मती सेवादलाचे संस्थापक श्री मिहीरजी गांधी उपस्थित होते. मिहिर गांधी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना मिहीर गांधी म्हणाले ” लॉकडाऊन काळात आरोग्य, पोलिस , सफाई कर्मचारी, भाजीपाला विक्रेते व किराणामालाचे दुकानदार यांनी दिलेल्या सेवा बद्दल त्यांचे आभार मानले. तसेच रत्नत्रय शिक्षण संस्थेची होणारी प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी या शैक्षणिक संकुलसाठी भरीव निधी मिळवून देण्याच आश्वासन दिले.”
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अनंतलाल (दादा) दोशी म्हणाले ” आपला देश राज्यघटना व लोकशाही मुळे सुरक्षित आहे. त्यासाठी राज्यघटना व लोकशाही टिकून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.
चेअरमन मा. श्री. प्रमोदभैय्या दोशी म्हणाले ” लॉकडाऊन काळात सर्व शिक्षकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.
तसेच संस्थेच्या पुढील शैक्षणिक धोरण व योजना स्पष्ट केल्या.”
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अनंतलाल दोशी, रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन श्री विरकुमार दोशी, रत्नत्रय इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय चेअरमन प्रमोद दोशी, उपाध्यक्ष तुषार गांधी, श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदस्य श्री रामदास कर्णे, प्रशाला कमिटी सदस्य सतीश बनकर, दत्ता भोसले, अक्षय गांधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक दैवत वाघमोडे सर सूत्रसंचालन माधुरी रणदिवे मॅडम व श्री सतिश हांगे सर,तर आभार प्रदर्शन श्री.अमित पाटील सर यांनी केले.

You may have missed