नातेपुते येथे विविध मागण्यांसाठी एक दिवशीय आंदोलन
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी )नातेपुते ता.माळशिरस येथे एन.डी.एम.जे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागास वर्गीय.बहु संस्था, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने नातेपुते येथे धरणे आंदोलन करण्यात आले . हे आंदोलन विविध मागण्यांसाठी करण्यात आले होते या आंदोलनात1)सोलापूर जिल्ह्यासह माळशिरस तालुक्यातील सन 2011पूर्वीची अतिक्रमणे नियमानुकुल करण्यात यावीत 2)गायरान, गावठाण, शेती महामंडळ ई जागेवरील अतिक्रमणे कायम करावीत 3)ज्या ग्रामसेवकांनी अतिक्रमण सर्वे व्यवस्थित केला नाही त्या ग्रामसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी 4)गायरान, गावठाण, शेती महामंडळ येथील फेरसर्वे करण्यात यावा 5)पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ तात्काळ कमी करण्यात यावी या या मागण्या साठी आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनावेळी एन.के साळवे, विकास(दादा) धाईजें,समीर सोरटे, उमाजी बोडरे,प्रमोद शिंदे,अजित शिरतोडे, प्रशांत खरात,सोमा भोसले, गुरू करचे,बाबा ननवरे,संतोष देवकाते,अनिल काळे,प्रेम देवकाते,अजित पांढरे,दत्ता कांबळे,सचिन झेंडे, विशाल झेंडे, रवी झेंडे,अप्पा गाडे, नितीन मोरे, प्रशांत साळवे,विशाल गायकवाड, नाना गायकवाड,धर्मअशोक सावंत,ठोंबरे रियाज भाई, बाळासो चव्हाण ई सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. हे निवेदन मंडल अधिकारी चव्हाण साहेब,तलाठी उन्हाळे भाऊसाहेब यांनी स्वीकारले. आंदोलनाचे आयोजन समाजीक कार्यकर्ते विशाल साळवे,सागर बिचुकले, सुनील ढोबळे, रणजित कसबे, अनिल लांडगे व कार्यकर्त्यानी केले होते.