नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील फोंडशिरस येथील आरोपीस एक वर्ष श्रम कारावासाची शिक्षा

नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील फोंडशिरस येथील आरोपीस एक वर्ष श्रम कारावासाची शिक्षा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते -प्रमोद शिंदे- नातेपुते तालुका माळशिरस पोलिस ठाणे हद्दीत फोंडशिरस येथील दोघांना मारहाण केल्या प्रकरणी आरोपीना एक वर्षाचा श्रम कारावास व एकूण सहा हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा माळशिरस कोर्टाने सुनावले आहे.यासंदर्भात हकीकत अशी की फोंडशिरस येथील  फिर्यादी वसंत वाघमोडे व त्याच्या आई विमल वाघमोडे दोघेही राहणार फोंडशिरस तालुका माळशिरस शेतामध्ये पिकात पाणी धरत असताना दिनांक 24/1/2013 रोजी सकाळी 11 वा. सुमारास शेतीच्या वादातून आरोपी बालचंद्र कोडलकर,वसंत कोडलकर या दोघांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन शिव्यागाळी केली. त्यामुळे आरोपींविरुद्ध नातेपुते पोलीस ठाणे येथे भाग 5 गुन्हा रजिस्टर नंबर 14 /2013 भादवि कलम  325,323, 504,34 अन्वये फिर्याद दाखल करण्यात आला आली होती.सदर गुन्ह्यातील साक्षीदार फिर्यादी पंच साक्षीदार वैद्यकीय अधिकारी व तपासी अंमलदार यांचा साक्ष पुराव याकामी महत्त्वाच्या ठरल्या. दिनांक 3/2 /2021 रोजी मे.जी.एम.नदाफ सो प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी माळशिरस यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपींना भादवि कलम 325 कलमान्वये दोषी ठरवून आरोपींना एक वर्ष सश्रम कारावास व एकूण सहा हजार रुपये द्रव्य दंड अशी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.सदर गुन्ह्याचे कामकाज सरकारी वकील श्री एस.एन.तरळगट्टी व नातेपुते पोलीस ठाण्याचे कोर्ट ऑडली पोलीस हेड कॉन्स्टेबल 394 शिवाजी घाडगे व तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार कंते यांनी कामकाज पाहिले.

You may have missed