पिरळे ग्रामपंचायतीवर महिलाराज सरपंच अलका नरोळे तर उपसरपंच कमल खिलारे

पिरळे ग्रामपंचायतीवर महिलाराज सरपंच अलका नरोळे तर उपसरपंच कमल खिलारे
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)– पिरळे ग्रामपंचायतीची नुकतेच सरपंचपदाची निवडणूक झाली असून या निवडणुकीत ग्रामपंचायतीवर महिलाराज आले असून सरपंच पदी अलका रामलिंग नरोळे तर उपसरपंच पदी कमल दादा खिलारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या व निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रथम निवडणुका झाल्या व नंतर सरपंच आरक्षण जाहीर झाले.यात पिरळे ग्रामपंचायतीवर उद्योजक संदीप संदीप नरोळे यांच्या आई अलका नरोळे या सरपंच पदी तर सामाजिक कार्यकर्ते उमेश खिल्लारे यांच्या आई कमल खिलारे उपसरपंच पदी विराजमान झाल्या आहेत. निवडी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी आर.एस रणवरे, ग्राम विकास अधिकारी रमेश जमदाडे,सदस्य अमोल बाळू शिंदे, रेश्मा सुनील दडस, विद्या दशरथ लवटे, वर्षा भिमराव वाघमोडे,सुनिता आबा शिंदे,सुशीला रघुनाथ वाघ, व कर्मचारी उपस्थित होते.सरपंच व उपसरपंच यांची निवड झाल्यानंतर गावात आनंदाचे वातावरण झाले असून सरपंच उपसरपंच व सदस्य यांचा ग्रामस्थांच्या वतीने पवार वस्ती,नरोळे वस्ती व अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आला. तसेच पार्टी प्रमुख संदीप नरोळे,अशोक तोडकर,बाळू शिंदे,गणेश दडस,उमेश खिल्लारे, दत्तात्रेय लवटे व इतर लोकांचा अकलूज येथे जयसिंह मोहिते-पाटील, मदनसिंह मोहिते-पाटील,धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील,अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला. पार्टी प्रमुख संदिप नरोळे बोलताना म्हणाले की आम्ही सर्व सदस्यांनी ग्रामपंचायत कारभार पारदर्शक होण्यासाठी शपथ घेतली आहे नेहमीच गावच्या विकासासाठी काम करत राहू.






