एन.आर. सी.कंपनी कामगार आंदोलनास बाळासाहेब आंबेडकर यांची भेट व वंचित बहुजन आघाडी चा आंदोलनास पाठींबा
एन.आर. सी.कंपनी कामगार आंदोलनास बाळासाहेब आंबेडकर यांची भेट व वंचित बहुजन आघाडी चा आंदोलनास पाठींबा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण संदेश भालेराव –कल्याण तालुक्याचे राहणीमान उंचावणारे व कल्याणच्या विकासात मानाचा तुरा रोवणारी एन आर सी कंपनी वीस वर्षापूर्वी दिमाखात चालू होती या कंपनीमध्ये नायलॉन या नावाचा धागा बनत होता त्याची क्वालिटी एक नंबरची होती त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे एन आर सी कंपनी मोठ्या जोशात चालत होती. त्यामुळे इथल्या पंचक्रोशीतील दहा ते बारा हजार कामगार अतिशय गुण्यागोविंदाने आणि चांगल्या पद्धतीने आपले जीवन जगत होते पण त्यातच 2009 साली या कंपनीला ग्रहण लागून कंपनी अचानकपणे बंद पाडण्याचा निर्णय कंपनीचे संचालक गोयंका घेतला त्यामुळे कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली कामगारांना पी एफ,फंड व ग्रज्युएटी इत्यादी प्रकारचे देणी न देता एका अदाणी नामक भांडवलदारा जमीन खरेदी देवून जमीन विकण्यात आली. अदानी या भांडवलदारांने गेली सात तेआठ वर्ष झाली पण इथल्या कामगाराला एक रुपाया न देता कामगारांची पिळवणूक करु लागला म्हणून येथील कामगारांनी एकत्रित येऊन कंपनी विरुद्ध न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली होती.त्यावेळी न्यायालयाने कंपनीच्या सर्व कामगारांचे सर्व देणी दिल्याशिवाय विकत घेणा-या भांडवलदाला एक इंच सुद्धा जमीन ताब्यात घेता येणार नाही. कामगारांना न्याय मिळण्यासाठी
येथील संघटीत कामगारांनी वविविध पक्षातील राजकीय लोकांनी उपस्थिती दाखवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलना ठिकाणी भेट देऊन कंपनीतील कामगारांनी केलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला. हे सरकार कामगारांचे शोषन करते आणि भांडवलदारांना पाठीशी घालते अशी टीका बाळासाहेब आंबेडकर यांनी केली. गेली 20 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. कॉम्रेड उदय चौधरी, भीमराव डोळस, वळसे पाटील साहेब व कार्यकर्ते आंदोलन सहभागी आहे याआंदोलनाला वंचित बहुजन आघाडी कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब भोईर, महासचिव विजय कांबळे, संघटक विनोद रोकडे, कल्याण शहरअध्यक्ष प्रवीण बोदडे, संदेश भालेराव, सुरेश पंडीत, सुनिता राजगुरू यांनी पाठिंबा दिला.