भारतीय संविधानाबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी मुरबाड येथे पोलिस स्टेशनला घेराव
पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क कल्याण:संदेश भालेराव
संविधान सन्मान मोर्चा
मुरबाड (दि. ५) : भारतीय संविधानाबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी सोमवारी आंबेडकरी समाजाने मुरबाड पोलीस स्टेशनला घेराव घातला असता यावेळी पोलिसांनी क्रॉस कंपलेंटची भूमिका घेतल्याने आज तालुक्यातील आंबेडकरी समाजाने एकत्र येऊन संताप व्यक्त केला.
मुरबाड तालुक्यातील फणसोली येथील एका इसमाने फेसबुकवर संविधानापेक्षा मनुस्मृति श्रेष्ठ असल्याच्या आशयाची पोस्ट व्हायरल केली होती. या गैरप्रकारामुळे संतापाची लाट उसळलेल्या तालुक्यातील आंबेडकरी जनतेने मुरबाड पोलीस ठाण्यात उपस्थित राहून संबंधित घटनेची माहिती मुरबाड पोलिसांना दिली. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात येऊन आरोपीला अटक ही करण्यात आली. मात्र यात फिर्यादींवर ही गुन्हे नोंद करण्यात आल्याने संतप्त आंबेडकरी जनतेने आज मुरबाड पोलीस स्टेशन ते तहसील कार्यालयावर पायी ‘संविधान सन्मान मोर्चा’ काढून घोषणाबाजी करीत मुरबाड पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेचा निषेध केला. तसेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले.
मात्र आमच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास यापेक्षाही मोठ्या मोर्च्याचे आयोजन केले जाईल, असा इशारा अनेक आंबेडकरी नेत्यांनी आपल्या भाषणातून वैक्त केले