जिद्दी आणि कष्टाळू भारत सोरटे युवकांपुढे ठरला आदर्श

कष्ट हेच भांडवल भारत सोरटे युवकांपुढे ज्वलंत उदाहरण

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)

लहानपणापासूनच परिस्थितीची जाण असलेला नातेपुते येथील भारत सोरटे हा युवक जिद्द ,चिकाटी, कष्टाच्या जोरावर आज युवकांसमोर आदर्श ठरत आहे.भारत वसंत सोरटे याची घरची परिस्थिती अतिशय हालाखीची होती वडील हे कुशल कुस्तीगीर वस्ताद होते वडील आजारी पडल्यानंतर आईवडिलांची अत्यंत प्रामाणिकपणे त्याने सेवा केली आहे.तसेच वाट्टेल ते मिळेल ते काम त्याने करून आपले बी.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कधीही कोणासमोर हात न पसरता प्रसंगी गवंड्याच्या हाताखाली तसेच मजुरीचे काम न लाजता त्याने केले.काम करत करत त्याला व्यायामाची अत्यंत आवड होती तो स्वतः निर्व्यसनी राहून व्यायाम करत बलदंड शरीर यष्टी त्याने  कमवली पिळदार शरीराच्या जोरावर त्याने कष्ट करून प्रपंच चालवला परिस्थिती नसताना मित्रांच्या सहकार्याने स्वतःचा शुद्ध पाण्याचा प्लांट उभा केला व संपूर्ण नातेपुते व परिसरात लोकांना थंडगार व शुद्ध पाणी पोहोचवण्याचं काम करीत आहे त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तो स्वतःचा प्रपंच चालवत असून त्यामध्ये तो खुश आहे. कितीही अडचणी आल्या तरी तो सतत हसतमुख असतो म्हणून तो आज युवकांपुढे एक आदर्श ठरत आहे.

सतत हसतमुख असणारा भारत सोरटे

You may have missed