नातेपुते येथे विना मास्क फिरणारास होणार ५०० रुपयांचा दंड

नातेपुते येथे विना मास्क फिरणारास होणार ५०० रुपयांचा दंड
प्रमोद शिंदे- नातेपुते –
नातेपुते आणि परिसरात विना मास्क फिरनारास पाचशे रुपयाचा दंड केला जाणार असल्याचा एक मताने ठराव करण्यात आला आहे. ही कार्यवाही बुधवार दिनांक 17 मार्च रोजी पासून सुरू करण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.या संदर्भात व्यापारी व नागरिक यांची कोरोना प्रतिबंध उपाय योजना करण्यासाठी नातेपुते पोलीस स्टेशन येथे तातडीची बैठक घेण्यात आली होती. ही बैठक कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज सोनवलकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत शासनाचे सर्व नियमांचे पालन करण्यासंदर्भात व्यापारी बंधूंना सूचना दिल्या गेले आहेत.सूचना व नियमांचे पालन न करणाऱ्या व्यापारी व ग्राहक यांचेवर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे यावर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून शासनास सहकार्य करण्याची भूमिका व्यापारी बंधूंकडून व्यक्त करण्यात आली आहे. या बैठकीत कोरोना रोखण्यासाठी उपाय योजना म्हणून डॉक्टर एम.पी.मोरे,रिपाईचे ज्येष्ठ नेते एन.के.साळवे,सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर,लतीफभाई नदाफ,उपसरपंच अतुल पाटील,आप्पासाहेब भांड, नरेंद्र गांधी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी संदीप दादा ठोंबरे,डॉ.नरेंद्र कवितके,ज्येष्ठ पत्रकार सुनील दादा राऊत, श्रीकांत बाविस्कर,आनंद कुमार लोंढे,विलास भोसले,प्रमोद शिंदे,आनंद जाधव,सुनील गजाकस,प्रशांत खरात,भगत महाराज त्याच प्रमाणे नातेपुते येथील व्यापारी असोसिएशनचे नरेंद्रभाई गांधी,बाहुबलीसेठ शंकेश्वरा व मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.तसेच कोरोना च्या नावाखाली साठेबाजी करुन चढ्या दराने माल विक्री करून ग्राहकांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले आहे.

You may have missed