१७ वर्षांन पासून फरारी आरोपीस गुन्हे शाखा- १, काशिमिरा कडून अटक
१७ वर्षांन पासून फरारी आरोपीस गुन्हे शाखा- १, काशिमिरा कडून अटक
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वसई
मा. पोलीस आयुक्त वसई विरार,मिराभाईदर सदानंद दाते (भपोसे) यांनी दिलेल्या फरारी आरोपींच्या शोध मोहिमे अंतर्गत एका १७ वर्षांन पूर्वी धाडसी दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपीस गुन्हेशाखा १ ने नुकतीच अटक केली आहे.
दिनांक ५ फेब्रुवारी २००४ रोजी रात्री भारती ज्वेलर्स शांती नगर, मिरारोड पूर्व या दुकानाच्या वॉचमनला चाकू व रिव्हाल्वरचा धाक दाखवून शटरचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २९ लाख ६३ हजाराचा मुद्देमाल लुटून चोरट्याने पोबारा केला होता. या बाबत मिरा रोड पोलीस ठाणे येथे भादंवि कलम ३९२, ४१२ व शस्त्र कायदा ३/२५ नुसार गुन्हा नोंद क्रमांक ४५/२००४ द्वारे नोंद करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीचां शोध गुन्हेशाखा- १ चे पोलीस करीत होते.
या प्रकरणातील मुख्य आरोपी भुशीसिंग ऊर्फ दिपकसिंग टाक (३६) हा असून तो भिवंडी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांनी प्राप्त केली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून टाक यास अटक केली आहे. सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याचा विरुद्ध दरोडा, जबरीचोरी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त एस. जयकुमार, पोलीस उपायुक्त(गुन्हे) डॉ. महेश पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक.अविराज कुराडे, विलास कुंटे, पोउपनि. हितेद्र विचारे, सपोउपनि.राजू तांबे, पोहवा.किशोर वंडिले, पो ना.सचिन सावंत, पोशि.राजेश श्रीवास्तव, सुशील पवार, या गुन्हे प्रगटीकरण शाखा-१ यांनी केली आहे.