शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यास आंदोलन करणार रासप माळशिरस तालुका

वीज बोर्ड नातेपुते अधिकारी यांना निवेदन देताना रासप पदाधीकारी व तालुकाध्यक्ष माऊली सरकार , कार्यकर्ते
अधिकार्‍याची चर्चा करताना रासप नेते नितीन दादा धायगुडे सचिन सूळ, बशीर भाई काजी, शाहिद भाई मुलांनी व पदाधिकारी

 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यास राष्ट्रीय समाज पक्ष माळशिरस तालुका व नातेपुते शहराच्या वतीने  आंदोलन करणार असल्याचे वीज बोर्ड नातेपुते यांना निवेदन देऊन इशारा  देण्यात आला. यासंदर्भात कार्यकारी उप अभियंता यांना रासप पदाधिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.नातेपुते व परिसर शेतकऱ्यांचे विज पंप कनेक्शन मोठ्या प्रमाणात तोडण्यात आले आहेत.यावर राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक होऊन त्यांनी शेतकऱ्यांसाठी वीज बोर्डाकडे धाव घेतली आहे.पदाधिकारी बोलताना म्हणाले की शेतकरीच्या हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्याचे काम हे सरकार करीत आहे, शेतात उभी असलेली पीके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत,उभ्या पीकावर नागर फिरवण्याचे काम सरकार कडून केले जात आहे  मागील 4,5 दिवसा पासून विज कनेक्शन तोडण्याचे पाप हे सरकार करत आहेत अशा प्रकारचा सरकारचा निषेध करत टीका ही पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आली .त्या संदर्भात  राष्ट्रीय समाज पक्ष माळशिरस तालुका व नातेपुते शहरच्या वतीने निवेदन देण्यात आले.लवकरात लवकर तोडलेली वीज कनेक्शन जोडावेत अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माळशिरस तालुका अध्यक्ष माऊली सरक यांनी दिला या वेळी रासपचे नितीन दादा धायगुडे, बशीर काझी ,शाहिद मुलाणी,रणजित सूळ,माऊली सरक, कविता माने, रियाज आतार,अण्णासाहेब पांढरे, सहदेव गोफणे, अमरजीत जानकर,बाबा बोडरे, वलेकर सर,बापूराव जानकर,नामदेव टकले, मेटकरी,सागर राऊत,चंद्रकांत काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

You may have missed