डॉ.आंबेडकरांना अपेक्षित क्रांती प्रतिक्रांती आणि देशातील परिस्थिती 20 मार्च महाड सत्याग्रहाच्या निमित्ताने… लेखक डॉ. कुमार लोंढे

लेखक डॉ. कुमार लोंढे
संपादक जनविद्रोही
मो.9881643650

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-वही कौम तरक्की करती है जिस कौम में क़ुरबानी देने और लेने की जज्स्बा और क्षमता होती है|………………….
बाबा साहेब डॉ भीम राव अम्बेडकर

 
युरेशियन ब्राह्मणांनी देशावर आक्रमण करून भारतातील मानवतावादी व बुद्धाच्या भारताला विषमतावादी,कर्मकांड आणि धार्मिकतेच्या उन्मादाने क्रांती व प्रतिक्रांतीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे.

देशाला आज क्रांतीची गरज आहे परंतु भारत प्रति क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे महागाई, बेरोजगारी ,भ्रष्टाचार ,जातीयता, दलित अत्याचार, राष्ट्रीयीकृत बँकांचे होणारे खाजगीकरण, शैक्षणिक क्षेत्रातील अवास्तव व बेजबाबदार असे धोरण,आरोग्य क्षेत्राला काळिमा फासणारे कलुषित निर्णय,अर्थसंकल्पात केलेली आरोग्य, शिक्षण ,रोजगार व मूलभूत सुविधा यावरती केलेली अल्पशी तरतूद ,शेतकरी धोरण, कारखानदार व परराष्ट्र धोरण या सर्व बाबतीमध्ये भारत आज प्रतिकार क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

 केंद्रात मोदी सरकार आहे म्हणजेच भाजपा पुरस्कृत सरकार आहे राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांचं त्रिकूट सरकार आहे तसं  पाहायला गेलं तर भाजपा केंद्रामध्ये सत्ता आरूढ आहे आणि देशांमध्ये आरएसएसचा जो धर्म आणि हिंदू राष्ट्र याचा जो धर्माचा उन्माद चालू आहे व इतर जातींना अल्पसंख्यांकांना बहुजनांना ओबीसींना त्यांचे हक्क-अधिकार यापासून धावणारे धोरण भाजप राजरोसपणे राबवत आहे हे सर्व काँग्रेसची देणआहे आपल्याला आठवत असेल आरएसएस चा जन्म काही आज झालेलं नाहीये स्वातंत्र्याच्या पूर्वी सुद्धा हेगडेवार गोळवलकर यांची RSS होती व आज ही आहे एवढ्या दिवसांमध्ये देश विघातक कारवाया शस्त्रास्त्र व नागपूर येथे अगदी राजरोसपणे शस्त्रपूजन होत असताना आमचे देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही सरकारने त्यांना अटकाव केला नाही.पाठी मागील वेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतली शस्त्र पूजनाच्या संदर्भामध्ये ती खरंच कौतुकास्पद व संविधानिक आहे. 
आज क्रांती करायची तर कशी करायची? कोणाच्या विरोधात करायची? आणि का करायची? हे जर आम्हाला समजत नसेल तर त्या क्रांतीला काही महत्त्व नाही.  खरच देश क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे परंतु आम्ही सर्व आमच्या भावना आकांक्षा इच्छा व मूलभूत स्वातंत्र्याला अधिकार,घटनादत्त अधिकार गाठोडे मध्ये बांधून उशा खाली घेऊन झोपलो आहे अशी असणारी परिस्थिती आहे. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी पुकारलेला जगातील एकमेव असा सत्याग्रह आहे जो माणसाला माणूसपण देणारा माणसांच्या हक्का करता, अधिकारा करता, आणि वर्णव्यवस्था वादि प्रतिक्रांतीला आव्हान देऊन क्रांती करणारा आहे.  म्हणून 20 मार्च हा भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासातील मानवाच्या मूलभूत आणि संविधानिक आधारित अधिकाराचा हा विजय आहे. बांधवांनो आज 20 मार्च आपण ही क्रांती आणि प्रतिक्रांती दोन शब्दातील महत्त्व समजून आपण क्रांती करणं गरजेच आहे का शांत बसणं गरजेचं आहे हे आपण आत्मसात करणं हेच खरं आजच्या दिवशी महत्त्वाच आहे.
भारतामध्ये गांधीवाद आंबेडकर वाद आणि मनुवाद तीन वाद आहेत.  देशाला जर पुढे न्यायचे असेल तर केवळ आणि केवळ आंबेडकर वाद तारू शकतो परंतु याही पुढे जाऊन आंबेडकर वाद आणि गांधीवाद हातात हात घालून काम करू लागले तर या देशातील मनुवाद मुळासकट उखडून फेकण्याची ताकद आंबेडकरी जनतेमध्ये आहे.फक्त काँग्रेस ने प्रतिगामी की पुरोगामी हे एकदाचे ठरवावे व मनुवादाची झालर व वर्णव्यवस्थेची कवच कुंडले फेकून sc,st,obc व minorities समूहाच्या क्रांतीच्या आशा पल्लवित कराव्यात अन्यथा भाजपा व काँग्रेस एकमेकाहून वेगळी असेल असे म्हणता येणार नाही.देशात नवपर्याय शोधून देशात क्रांतीचा तिसरा पर्याय उभा करणे अशक्य प्राय असे नाही.शेतकरी ,कष्टकरी, अस्पृश्य व बहुजन बांधवांना आंबेडकरवाद हाच सक्षम व संविधानिक समतावादी क्रांतीचा विचार ठरू शकतो.हे क्रांतीदिनी अधोरेखित होताना दिसत आहे

👇 याचा एक मात्र उपाय

शूद्र ( obc ), अतिशूद्र ( sc/st )
जाति तोड़ो समाज जोड़ो…!

बहुजन समाज बनाओ
अल्पसंख्याक को मिलाओ…!!

अपनी ताकत दिखाओ
मनुवाद से मुक्ति पाओ…!!!

धन, धरती और साधन बांटो
बाद में आरक्षण बांटो
…!

जिसकी जितनी संख्या भारी
उतनी उसकी हिस्सेदारी…!!

डॉ.आंबेडकरांना अपेक्षित क्रांती प्रतिक्रांती आणि देशातील परिस्थिती 20 मार्च महाड सत्याग्रहाच्या निमित्ताने… लेखक डॉक्टर कुमार लोंढे

kumarlondhe

drkumarlondhe

You may have missed