महाड मुक्तीसानंग्राम 20 मार्च दिन देशाची राजधानी दिल्ली येथे साजरा

महाड मुक्तीसानंग्राम दिन देशाच्या राजधानीत साजरा करताना एन डी एम जे ची टीम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस च्या वतीने अभिवादन
महाड क्रांती दिनानिमित्त मार्गदर्शन करताना एडवोकेट डॉक्टर केवल उके व एन डी एम जे पदाधिकारी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नवी दिल्ली-
इंडियन सोशल इन्स्टिट्यूट लोधी रोड दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर व प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई बाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर सामूहिक अभिवादन करून महाड मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला.यावेळी एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवल उके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यामध्ये त्यांनी संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथे 20 मार्च दोन हजार 1927 रोजी चवदार तळ्याच्या पाण्यासाठी महाड मुक्तिसंग्राम करून आपल्या हजारो अनुयायांच्या सोबत चवदार तळ्याच्या पाण्याला हात लावून पाणी सर्वांसाठी खुले असल्याची भावना अस्पृश्यामध्ये निर्माण केली होती.यासोबतच महाड चवदार तळ्याच्या संदर्भातील न्यायालयीन खटलेसुद्धा लढून जिंकले होते मुख्य म्हणजे या आंदोलनात बाबसाहेबांच्या सोबत अस्पृश्यांच्याबरोबरच काही सवर्ण सुद्धा होते.असे विचार नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवल उके यांनी व्यक्त केले.संघटनेचे राज्य सहसचिव पी.एस.खंदारे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली.यावेळी एन.डी.एम.जे संघटनेचे राष्ट्रीय टीम च्या जुडीत,नवीन गौतम,सुचिता,देबजानी,श्वेता गिमरे,व विविध राज्यातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते.

You may have missed