दिल्ली येथे एन डी एम जे यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय चार दिवसीय दलित मानवाधिकार कार्यकर्त्यांची कार्यशाळा संपन्न
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क दिल्ली– दिनांक १७ ते २० मार्च २०२१ रोजी न्यु दिल्ली येथील इंडियन सोशल इन्स्टिट्यूट येथे नॅशनल दलीत मूव्हमेंट फॉर जस्टिस च्यां वतीने दलीत मानवाधिकार कार्यकत्यांची चार दिवसीय दलीत व आदिवासी मुलांचे हक्क व संरक्षण आणि सोशल मीडिया चा वापर कसा करायचा याविषयी आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये देशातील विविध राज्यातील कार्यकर्ते आपापल्या राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपस्थित झाले होते.त्यामध्ये महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्याचे महासचिव ॲड.डॉ. केवल जी उके,सचिव वैभव जी गीते,सहसचिव पी.एस.खंदारे,महिला राज्य संघटक पंचशीला ताई कुंभारकर,अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रेरणा धेंडे यांनी महाराष्ट्र च्या वतीने प्रतिनिधित्व केले.तसेच महाराष्टातील घडलेल्या दलीत अत्याचाराच्या गंभीर घटनावर देखील चर्चा झाली.कार्यशाळेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.लहान मुलांचे संगोपन कसे करायचे,हीच मुले उद्याच्या आपल्या देशाचे भविष्य असल्याने त्यांच्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.परंतु सद्यस्थितीत लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी सर्वांनी लहान मुलांवर विशेष लक्ष द्यायला हवे त्यांना गूड टच, बड टच याविषयी चे ज्ञान द्यायला हवे.त्यांच्या मध्ये लीडर शिप क्वालिटी विकसित करायला हवी.याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.तसेच दलीत मानवाधिकार कार्यकत्यांनी सोशल मीडिया चा वापर कसा करायला हवा याविषयी देखील मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे संयोजन डॉ.व्ही.ए.रमेश नाथन, ॲड.राहुल सिंह, जुडिथ ॲने, देबजनी साहू, ॲड नवीन गौतम यांनी केले.