नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नातेपुते पोलिसांनी केले गुन्हे दाखल

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते प्रतिनिधीनातेपुते येथे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दिलेल्या नियमांचे पालन न करणा-यांवर नातेपुते पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सध्या कोरोनाविषाणू चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून तो रोखण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहे. त्याचा एक भाग म्हणून मा.सोलापूर जिल्हा अधिकारी गर्दी टाळण्यासाठी दिनांक 25/3/2021 रोजी जिल्ह्यातील सर्व कार्य क्षेत्रांमध्ये असणारी सर्व दुकाने अत्यावश्यक सेवा वगळून सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.त्यानंतर जमावबंदीचे आदेश ही दिले आहेत. त्याचप्रमाणे शनिवार-रविवार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु दिनांक 26 3 2021 रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान स्वतः नातेपुते पोलीस स्टेशन येथील ए.पी.आय.मनोज सोनवलकर व त्यांच्यासोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल /16-26 सचिन वाघ, 813 तळेकर ,1788  कदम, पोलीस नाईक/1533 बबलू गाडे,1788 पाटील,पोलीस कॉन्स्टेबल 12 घाडगे,2139 कापसे असे सरकारी वाहनाने गस्त करत असताना माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना सत्यजित परमिट रूम जवळ असलेली पानटपरी चालक गणेश बाळासाहेब डफळ रा.नातेपुते हा निर्बंध घातलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ ग्राहक करताना मिळून आला आहे.तसेच नातेपुते वालचंद नगर रोड लगत बोडरे कॉम्प्लेक्स मधील गाळ्यांमध्ये फिटनेस जिम अँड प्रोटीन शॉप मध्ये जाऊन पाहणी केली असता सदर जिम मध्ये 8 ते10 इसमे एकत्र येऊन व्यायाम करत असल्याचे दिसून आल्यानंतर जिमचे मालक माऊली कांतीलाल पोटे रा.नातेपुते तसेच नातेपुते ग्रामपंचायत येथील भेळीचे गाडे जास्त वेळ चालू ठेवून ग्राहक करत असताना भेळ गाडीचे मालक दिपक मधुकर पद्मन व अक्षय निवृत्ती पिसे आढळून आल्याने या सर्वांविरुद्ध भादवि कलमान्वये आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आगामी काळात शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती,संस्था,संघटना यांच्यावर भादवि कलम 188 मधील तरतुदी नुसार कायदेशीर  आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कारवाई करण्यात येईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.                               

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नातेपुते पोलिसांनी केले गुन्हे दाखल