नेहमीच गजबजलेल्या नातेपुतेत शुकशुकाट
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- माननीय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व शासनाच्या आदेशानुसार नेहमीच गजबजलेली प्रमुख बाजारी व्यापारपेठ नातेपुते व परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. मा.जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांचे दिनांक 25 मार्च रोजीचे आदेश असून या आदेशाचे पालन करण्यात आले. फौजदारी प्रक्रिया संहिता 1993 चे कलम 144 नुसार जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणेबाबत शासनाच्या आदेशान्वये प्रतिबंध कायदा 1897 मधील तरतुदीनुसार covid-19 नियंत्रित आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांना शासनाच्या वतीने उपाययोजना करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंतच चालू राहतील हे निर्बंध अत्यावश्यक सेवा वगळता करण्यात आले आहेत.अत्यावश्यक सेवेमध्ये मनुष्य व प्राणीमात्रांना साठी जीवनावश्यक वस्तू भाजीपाला,फळे,किराणा,दूध,वृत्तपत्र वितरण या बाबींना निर्बंध लाभ राहणार नाही.प्रत्येक शनिवारी व रविवारी सोलापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद राहतील त्यादिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना निर्बंध असेल सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार व जनावरांचे बाजार बंद राहतील.खाद्यगृह हे परमिट रूम/बार फक्त सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत कोरोना चे मार्गदर्शक तत्वे पालन करून 50% क्षमतेने सुरू राहतील, किचन व पार्सल रात्री दहा पर्यंत सुरू राहतील, सामूहिक स्पर्धा, कार्यक्रम बंद राहतील. जिम,व्यायाम शाळा,स्पोर्ट,कॉम्प्लेक्स,जलवितरण, वैयक्तिक राहतील.सर्व धार्मिक स्थळे मंदिरे सकाळी सात ते रात्री दहा पर्यंत चालू राहतील. तसेच मास्क वापरणे, सानी टायझर, सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक राहील.या नियमांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 45 ऑफ 1860 कलम 188 मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाईस पात्र करण्यात येईल 2005 साथरोग नियंत्रण तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असे आदेश सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. यावर नातेपुते व परिसरात कायद्याचे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे परंतु या बंदमुळे दररोज छोटे-मोठे व्यवसाय करणारे व मजूर हातावर पोट भरणारे यांचे हाल होताना दिसत आहेत.