खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी नातेपुते स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे – माळशिरस तालुक्यातील शेती पंपाचा बंद केलेला विद्युत पुरवठा परत चालू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. जिल्हाध्यक्ष भीमराव फुले यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने नातेपुते येथे रास्ता रोको व महावितरण कार्यालयास घेराव आंदोलन करण्यात आले.
मागील आठ ते दहा दिवसापासून माळशिरस तालुक्यातील शेती पंपाचा विद्युत पुरवठा पूर्वसूचना न देता विज बिल वसुलीसाठी खंडित करण्यात आला. तो वीजपुरवठा त्वरित चालू करण्यासाठी व शेतकऱ्यांचे एचपी प्रमाणे नोंद करून वाढीव बिल दुरुस्त करून, बिल आकारण्यात यावे या मागणीसाठी मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन नातेपुते येथील अण्णाभाऊ साठे चौक येथे करण्यात आले.आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अमरसिंह कदम,भीमराव,फुले हरिदास थिटे,दत्ता भोसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच उपकार्यकारी अभियंता किरण डोईफोडे यांनी तात्काळ तोडलेला विद्युत पुरवठा जोडून देऊन शेतकऱ्यांना सर्वे करून कमी एचपी प्रमाणे बिले दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी विनंती केले आहे. तसेच हे आंदोलन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मध्यस्थीने माघार घेण्यात आले. या आंदोलनास महादेव सावंत ,नारायण सावंत प्रशांत पवार अरुण ढगे मानसिंग पाटील,अंकुश बनकर,मुरलीधर सावंत, तुकाराम किर्दक कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी कार्यकारी उपअभियंता किरण डोईफोडे व दत्ता रुपनवर पुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना आश्वासन देताना