ॲड. प्रकाश आंबेडकर यांची राज्यपालांकडे सरकार बरखास्त करण्याची मागणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –
राज्यपालांच्या भेटीत सरकार बरखास्त करण्याची मागणी – ॲड. प्रकाश आंबेडकर.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी राज्यपालांची भेट घेत हे सरकार चोरांचे, खुन्यांचे असून ते बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ह्यांनी राज्यपालांची भेट घेऊन केली आहे. तसेच त्यांनी राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी निवेदन दिले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की पोलीस अधिकारी सांगत आहेत की राजकीय व्यवस्थेने आम्हाला वसुलीचे आदेश दिले आहेत त्याचे पत्र सुद्धा प्रसिद्ध केले आहे.शंभर कोटीच्या प्रकरणात एक मंत्री असू शकत नाही हा निर्णय एका मंत्र्याचा की पार्टी स्तरावर झाला आहे. याचा शोध घेतला पाहिजे आणि हे सर्व पुढे आणायचे असेल तर राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे. तसेच मनसुख हिरेन ,सुशांत सिंह,पूजा चव्हाण यांना सुसाईड दाखवण्यात आले आहे हे सुसाईड आहे त का? मर्डरत आहेत? हे लोकांमध्ये शंका आहे.अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या सोबत पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आ.धनराज वंजारी तसेच महिला आघाडीच्या अध्यक्ष मा.रेखाताई ठाकूर ह्या उपस्थित होत्या.

