माळशिरस येथे वीज कनेक्शन कट करण्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने रास्ता रोको

निवेदन देताना भाजप आमदार राम सातपुते व भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील,बाळासाहेब सरगर, बाजीराव काटकर व कार्यकर्ते
आंदोलनात मनोगत व्यक्त करताना आमदार राम सातपुते
मोर्चादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर

माळशिरस येथे वीज कनेक्शन  कट  करण्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने रास्ता रोको 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे– माळशिरस येथील अहिल्या देवी चौक येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने वीज कनेक्शन कट करण्याच्या निषेधार्थ व गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.या यावेळी माळशिरस चे आमदार राम सातपुते भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, ओबीसी मोर्चा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.आमदार राम सातपुते बोलताना म्हणाले की हे सरकार लाईट बिलाच्या नावाखाली  जनतेची लूट करत आहे तात्काळ शेतकऱ्यांची पिळवणूक  थांबवा तसेच धैर्यशील मोहिते पाटील बोलताना म्हणाले की कोरोना  व नैसर्गिक संकटामुळे कोलमडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी सक्तीची विजवल वीज बिल वसुली तात्काळ थांबवा तोडलेले कनेक्शन तात्काळ चालू करावी, तसेच गृहमंत्री अनिल देशमुख त्यांच्यावर असलेला शंभर कोटी रुपये वसुली च्या आरोपाचा निपक्षपाती तपास होण्यासाठी अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा.अन्यथा त्यांची हकालपट्टी करण्यात यावी.अशाप्रकारे त्यांनी आंदोलनात मागणी केली. हे आंदोलन  विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व आमदार राम सातपुते तसेच धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष सोपान काका नारनवर, के.के पाटील तालुकाअध्यक्ष बाजीराव काटकर, रचिटणीस संजय देशमुख, अतुल सरतापे, मारुती वाघमोडे दादासाहेब खरात दामोदर पालवे हनुमंत दुधाळ सर, शहराध्यक्ष संतोष वाघमोडे, शहर उपाध्यक्ष राजेन्द्र वळकुंदे,सुनील बनकर व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

You may have missed