विद्युत वितरण कंपनी च्या दुर्लक्षामुळे पाच दिवसापासून पिरळे गावठाण अंधारात
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –पिरळे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी नातेपुते विभागाच्यावतीने दुर्लक्ष केल्यामुळे पिरळे गावठाण गेल्या पाच दिवसापासून अंधारात असून गावकर्यां मधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. सध्या कोरोना चा वाढता प्रादुर्भाव असल्याकारणाने व लॉक डाऊन असल्याने गावातील सर्व लोक घरीच आहेत व उन्हाळा सुरू असल्याने उन्हाच्या तडाख्याने व गरमीने लोक हैराण झाले आहेत.त्यात गावांमध्ये पेशंट सुद्धा वाढत आहेत लोकांची गैरसोय होत आहे. वॉटर सप्लाय च्या विहिरीला पाणी नाही त्यामुळे गावातील बोरवेल च्या पाण्याचा वापर गावातील लोकांना करावा लागत आहे.घरातील सर्वच उपकरणे मोबाईल व इतर साधने लाईट वर अवलंबून असल्यामुळे जगणे अत्यंत कठीण झाले आहे.काही दिवसापासून पिरळे गावठाणा मध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे.यासंदर्भात वेळोवेळी गावकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे लाईट च्या संदर्भात तक्रारी केल्या आहेत.तक्रार केल्यानंतर लाईट ही तात्पुरत्या स्वरूपात सुरु केली जाते. परंतु कायमस्वरूपी तोडगा निघत नाही. गेल्या पाच दिवसांपासून पिरळे गावठाण येथील लाईट गेली असून अद्यापही लाईट आले नाही.त्याचे कारण असे की गावठाण येथील डीपी जळाला असून तो डीपी बसवण्यात विद्युत वितरण कंपनीस अपयश आले आहे.गावठाण डीपी वरती लोड असल्याकारणाने वारंवार डीपी जळत असून अनेक दिवसापासून ग्रामस्थांनी 63 केव्ही डीपी ऐवजी 100 केव्ही चा डीपी बसवावा व आणखीन एक नवीन 63 केवी स्वतंत्र डीपी बसवण्याची मागणी ीज वितरण कंपनीच्याअधिकार्यांकडे केली आहे.परंतु या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे गावाला वारंवार पाच-सहा दिवस अंधारात राहावे लागत आहे. या कारणामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत आहे.की तात्काळ 100 केव्ही व 63 केव्ही चे दोन स्वतंत्र डीपी बसवण्यात यावे अन्यथा वीज वितरण कंपनी कार्यालयात टाळे ठोकून कार्यालयासमोर ग्रामस्थांच्यावतीने तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.