पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या बातमीचा विद्युत वितरण कंपनीला शॉक बारा तासात काम पूर्ण
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-पिरळे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे गेल्या सहा दिवसांपासून विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे लाईट नसल्याने पुरोगामी महाराष्ट्र न्यूज ने याचा पाठपुरावा करत यासंदर्भात काल विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे पिरळे गावठाण अंधारात अशी बातमी प्रसिद्ध केली व लाईट च्या संदर्भात संपादक प्रमोद शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बोलणी करून तात्काळ वीज वितरण कंपनीला पिरळे गावठाणातील डीपी बसवण्यास सांगितले अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला असता तात्काळ वीज वितरण कंपनीने याची दखल घेत बारा तासाच्या आत नवीन डीपी व गावातील सर्व लाईटचे मेंटेनन्स एका दिवसात करून घेतले. यामुळे पिरळे गावठाणातील लाईट सुरळीतपणे सुरू झाली आहे व वरिष्ठांशी बोलले करून 100 केव्ही व 63 केव्ही अशा दोन एक्स्ट्रा डीपी ची मागणी केली आहे व अकलूज येथील उपविभागीय अभियंता यांनी लवकरच डीपी देण्याचे आश्वासन दिले आहे.त्यामुळे पिरळे येथील ग्रामस्थांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या बातमी मुळे महावितरण विद्युत कंपनीला शॉक लागला असल्याचं सोशल मीडियातून बोलले जात आहे. बारा तासात बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला.