नातेपुतेकरांच्या सेवेसाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर साई सेवा दल व मामाश्री प्रतिष्ठान च्या वतीने ॲम्बुलन्स सेवा सुरू
नातेपुतेकरांच्या सेवेसाठी नफा ना तोटा तत्त्वावर साई सेवा दलाच्या वतीने ॲम्बुलन्स सेवा सुरू


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
-नातेपुते ता.माळशिरस परिसरात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची दवाखान्यात येण्यासाठी गैरसोय होत आहे व ॲम्बुलन्स साठी रुग्णांना जास्त पैसे मोजावे लागतात गरीब आणि गरजू रुग्णांची पैशावाचून हेळसांड होऊ नये यासाठी.साई सेवा दल व मामाश्री प्रतिष्ठान यांच्या वतीने ना नफा ना तोटा या तत्वावर ऍम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. या ऍम्ब्युलन्स सेवे चे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, नातेपुते पोलीस स्टेशनचे ए.पी.आय मनोज सोनवलकर, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी,ॲडवोकेट शिवाजी पिसाळ पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, अतुल शेठ बावकर,विशाल साळवे, धनाजीराव पांढरे, दादासाहेब लांडगे ,साई सेवादल अध्यक्ष गुरु कर्चे ,रंजीत काळे,सोमनाथ भोसले व मान्यवर उपस्थित होते.