नातेपुते येथील मधुर मिलन कार्यालय ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाकडून जोर जबरदस्ती केली जातेय -दोशी कुटुंबीयांचा प्रशासनावर आरोप..
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते( प्रतिनिधी )–मधुर मिलन हे नातेपुते नजीक मांडवे हद्दीतील प्रसिद्ध असे दोन एकरात मोठे मंगल कार्यालय आहे. तसेच हे मंगल कार्यालय अभिजित दोशी व ऍड.दिपक फडे यांच्या मालकीचे आहे. हे मंगल कार्यालय गेल्यावर्षी कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने कोरोना पेशंट विलगीकरण करण्यासाठी प्रशासनाने देखभाल दुरुस्ती तसेच भाडेतत्वावर ताब्यात घेतले होते.कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने इमारत अभिजित दोशी यांच्या ताब्यात दिली होती.परंतु कोणत्याही प्रकारचा इमारत वापरल्याबद्दल मोबदला व देखभाल दुरुस्ती शासनाने दिली नाही तसेच याहीवर्षी कोरोनाची दुसरी लाट आली व प्रशासनाने जोर जबरदस्तीने कोरोना पेशंट विलगीकरण करण्यासाठी इमारत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु या इमारतीत सध्या अभिजीत सनद कुमार दोशी व त्यांचे नातलग वास्तव्यास आहेत. हे प्रशासनास माहित असून देखील प्रशासनाने जोर जबरदस्तीने त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध कार्यालय ताब्यात घेतले आहे व त्या मंगल कार्यालयाला बाहेरून कुलूप लावले आहे.असा आरोप अभिजीत सनद कुमार दोशी कुटुंबियांकडून होत प्रशासनावर आहे. दोशी कुटुंब याचं म्हणणं असा आहे कि आमच्या मंगल कार्यालयात लाखो रुपयांची झाड आहेत.गेल्या वर्षी या झाडांच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .प्रशासनाने लाईट बिल सुद्धा दिला नाही आम्ही स्वतःच्या पैशाने लाईट बिल भरून ही झाडे जगवली आहेत.काहीही झालं तरी आम्ही ही आमच्या मालकीची इमारत प्रशासनाला देणार नाही प्रसंगी आम्ही अमरण उपोषणास बसू अशी भूमिका अभिजित दोशी व कुटुंबीयांनी घेतली आहे.यावर मा. तहसीलदार यांनी सांगितले की ही इमारत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तरतुदी नुसार जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात दिनांक 18/4/2020 रोजी कोरोना संपेपर्यंत अधिग्रहित केली आहे इमारत कोरोना साठी वापरण्यास बंधनकारक आहे लाईट बिल भाडे संदर्भात वरिष्ठ कार्यालयास पत्रव्यवहार केला आहे जेव्हा पैसे येतील तेव्हा देऊ त्यांनी प्रशासनास सहकार्य करावे अशाप्रकारे मा.तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी भूमिका मांडली आहे. यावर अभिजित दोशी यांनी भूमिका मांडली की जर प्रशासनाने जोर,जबरदस्ती केल्यास दोशी कुटुंब मधुर मिलन मंगल कार्यालयात अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. यावर दोशी कुटुंब व प्रशासन यांच्यामध्ये मंगल कार्यालयवरून वाद निर्माण झाला आहे.