पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या उपक्रमात सहभागी होऊन नवदिशा देवकाते हिने अनाठाई खर्च टाळून गरीब मुलींना मदत करत वाढदिवस अनोख्या पद्धतीने केला साजरा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क– पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने अनेक विविध उपक्रम राबवले जातात त्यामध्ये वाढदिवसाचा अनाठाई खर्च टाळून गोरगरीब गरजू लोकांना मदत केली जाते.तशा प्रकारचा संदेश इतरांना दिला जातो.याच पुरोगामी महाराष्ट्र न्यूज उपक्रमात नवदिशा मार्तंड देवकाते नातेपुते येथील दाते प्रशालेतील ह्या इयत्ता अकरावी तील विद्यार्थिनी स्वयंपुर्ती ने सहभागी होऊन स्वतःच्या वाढदिवसाचा अनाठाई खर्च टाळून गरजू व गरीब मुलींना कोरोना काळात मदत व्हावी म्हणून ड्रेस व खाऊ दिले आहे.याचे वैशिष्ट्य म्हणजे नवदिशाने स्वता वर्षभर युट्युब वर व्हिडिओ बघून स्वतःच्या हाताने ड्रेस शिवलेले आहेत.व ते वर्षभर शिवलेले ड्रेस तिने पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयांमध्ये गरीब व गरजू मुलींना देण्यासाठी संपादक प्रमोद शिंदे व कार्यकारी संपादक प्रशांतजी खरात यांच्या स्वाधीन केले आहे.नवदिशा देवकाते व पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल च्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.गेल्या वर्षी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने गरीब व गरजू लोकांनाअन्नधान्य वाटप करण्यात आले होते.त्यामध्ये कुरबावी येथील वेदांत सागर दडस या चिमुकल्या चार वर्षाच्या मुलाने वाढदिवसानिमित्त त्याच्या खाऊचे पैसे जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यासाठी दिले होते.तीच प्रेरणा घेत नवदिशाने गरजू व गरीब मुलींना वाढदिवसानिमित्त ड्रेस व खाऊ दिले.तसेच पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयात संपादक प्रमोद शिंदे व कार्यकारी संपादक प्रशांत खरात यांच्या वतीने नवदिशाचा वाढदिवस साजरा करून सत्कार करण्यात आला तसेच नव दिशा आहे चांगली चित्रकार आहे तिने पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे सर्वेसर्वा संचालक एन डी एम जे चे राज्य महासचिव तथा आंतरजातीय विवाह मसुदा कायदा समिती सदस्य मंत्रालय मुंबई ॲड.डॉ.केवल उके यांचे हुबेहूब चित्र रेखाटून कार्यालयास भेट दिले.या दानशूर अहिल्या मातेच्या लेकीचे परिसरात कौतुक होत आहे.हे ड्रेस राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गरजू व गरीब मुलींना वाटप करण्यात येणार आहे.यावेळी नवदिशा चे वडील मार्तंड देवकाते,कन्हैया देवकाते रूपाली किसवे अनुभव देवकाते उपस्थित होते.