नातेपुते येथे मोकाट फिरणाऱ्यावर स्वतः तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी केली कारवाई
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
माळशिरस तालुका आणि नातेपुते परिसरात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रांत व तहसीलदार यांच्याकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत त्यामध्ये विविध ठिकाणी कोविंड सेंटर उभारली जात आहे परंतु लोक मात्र रस्त्यावर मोकाट फिरत असल्याचं लक्षात येताच मा.तहसीलदार जगदीश निंबाळकर साहेब यांनी स्वतः नातेपुते येथील अण्णाभाऊ साठे चौकात मोकाट फिरणाऱ्यावर नातेपुते पोलिसांच्या साह्याने कार्यवाही केली आहे. लोकांची कोरणा चाचणीकेली असून त्यामध्ये तीन लोक पॉझिटिव आले आहेत.व मास्क ,सोशल डिस्टंसिंग व इतर कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या चाळीस लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.यामध्ये 17 हजार 800 रुपये इतका दंड एका दिवसात वसूल करण्यात आला आहे.ही कार्यवाही करताना स्वतः तहसीलदार जगदीश निंबाळकर साहेब नायब तहसीलदार तुषार देशमुख साहेब डी एन काळे रावसाहेब नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज सोनवलकर पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा हंगे सचिन सूर्यवंशी नवनाथ माने सचिन कांबळे यांनी कामगिरी केली तसेच नातेपुते ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.