टाळेबंदी काळात शिवबा अन्न छत्रालयाने गरिबांना दिला मदतीचा हात..

टाळेबंदी काळात शिवबा अन्न छत्रालयाने गरिबांना दिला मदतीचा हात..

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण संदेश भालेराव –नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.), साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान, संत रोहिदास महाराज समाज प्रबोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० मे २०२१ पासुन “शिवबा मोफत अन्न छत्रालय” सर्व सामान्य गोरगरीब जनते साठी सुरू करण्यात आले आहे. शिवबा मोफत अन्न छत्रालयाच्या माध्यमातून उल्हासनगर येथील गांधी नगर, खेमानी आणि आसपासच्या जवळपास ५०० गरीब व गरजू कुटुंबाना दररोज एकवेळचे जेवण मोफत पुरविन्यात येते. लाॅकडाऊन सुरळीत होत नाही तोपर्यंत हा उपक्रम चालु ठेवण्याचा या तिन्ही संघटनेचा मानस आहे.

दिंनाक ३१मे २०२१ रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक तथा विद्यमान आमदार मा. आनंद शिंदे यांनी शिवबा मोफत अन्न छत्रालयाला भेट देवून गोर-गरिबांना भोजन पैकेटचे वाटप केले. यावेळी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन मंत्री यांचे स्वीय सहाय्यक मा.सुबोध भारत यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांनी उपस्थित राहून गरजूंना केक, लाडू आणि अन्नदान केले.

यावेळी एन.डी.एम.जे.राज्य महासचिव अ‍ॅड.डाॅ.केवल उके यांच्या सह प्रमुख आयोजक आयु.प्रकाश जाधव तसेच एड.दिलिप वाळंज यांनी टाळेबंदी दरम्यान हातावर पोट असणाऱ्या गरीब जनतेची उपसमारी आणि त्यातून उदभवनाऱ्या अनेक समस्या व गरीब कुटुंबाची व्यथा या उपस्थितांसमोर मांडून सढळ हाताने मदत करण्याचे आव्हान केले.

एन.डी.एम.जे. मुंबई-ठाणे प्रदेश अध्यक्ष बंदिश सोनावने, ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय कांबळे, जिल्हा सचिव विनोद एस.रोकडे, जिल्हा सहसचिव सुनिलजी ठेंगे, प्रसिद्धीप्रमुख संदेश भालेराव, कल्याण डोंबिवली शहर जिल्हाअध्यक्ष एड. प्रविण बोदडे, सचिव संदीप घुसळे,समाज सेवक राजन गायकवाड, पत्रकार मिलिंद वानखेडे,पप्पू जाधव, देवचंद अंबादे, लता पडघान, दादू चव्हान, नितीन जाधव, संदिप गवळी,आदर्श कांबळे, प्रविण लोंढे, बबलु कांबळे आणि राजेश जाधव आदि मान्यवर सदर अन्नदान कार्यक्रमात उपस्थित होते.

You may have missed