नातेपुते कृषी मंडल कार्यालयात निवृत्त कृषी पर्यवेक्षक यांचा सत्कार संपन्न
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –
नातेपुते तालुका माळशिरस येथील कृषी मंडल कार्यालयात येथे सेवा बजावणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग मधील नातेपुते मंडल कृषि आधिकारी कार्यालयाचे श्री नितीन गदादे कृषी पर्यवेक्षक नातेपुते १ ,श्री विष्णू निकम साहेब व कृषि पर्यवेक्षक नातेपुते – २ ,व श्री सर्जेराव निकम साहेब तसेच कृषी सहाय्यक फोंडशिरस सलग 38 वर्ष उत्कृष्ट सेवा करून सेवानिवृत्ती झाले त्या निमित्त कृषी खात्याच्या वतीने कृतज्ञता सोहळा व सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता त्यांना सन्मानपूर्वक सेवानिवृती पत्र देऊन सन्मान करून निरोप देण्यात आला. यावेळी नातेपुते मंडल कार्यालयातील मंडलाधिकारी श्री सतीश कचरे, कृषी अधिकारी कु तृप्ती पवार, कृषी सेवक श्री दत्तात्रय पांढरमिसे ,कृ.स श्री अमित गोरे,कृसे श्री मधूकर वाघमोडे,कृस श्री रंणजीत नाळे,कृस श्री सचीन दिउके, कृस श्री विजयकुमार कर्णे, श्री लालासाहेब माने व पंचक्रोशीतील मान्यवर पत्रकार श्रीकांत बाविस्कर, प्रमोद शिंदे आदी मान्यवर उपस्थितीत होते



