मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील फोंडशिरस ते बोडरे वस्ती रस्त्याचे सलग दोन दिवस राष्ट्रवादी व भाजप नेत्यां कडून उद्घाटन*


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –
मौजे फोंडशिरस येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन मंजूर झालेल्या फोंडशिरस ते बोडरे वस्ती देवकर वस्ती रस्त्याचे सलग दोन दिवस राष्ट्रवादी नेते व भाजपचे नेते यांच्या हस्ते भूमिपूजन व उद्घाटन संपन्न झाले. फोंडशिरस बोडरे वस्ती हा रस्ता ग्राम सडक योजने अंतर्गत 3.500 km मध्ये त्याचे मजबुतीकरण देखबाल करणे तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर पॅकेज ADB SoL-15 कामाचे अंदाजपत्रक 275. 93 लक्ष मंजूर असून रस्त्याचे उद्घाटन सलग दोन दिवस राष्ट्रवादी व भाजप नेत्यांकडून करण्यात आले . दिनांक 4 जून रोजी राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या हस्ते भूमिपूजनाचा नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले.यावेळी माजी जि.प. सदस्य भानुदास पाटील,पं.स. सदस्य अजय सकट, मधुकर वाघमोडे, सरपंच पोपट बोराटे,उपसरपंच दादा रणदिवे, ग्रामसेवक लोंढे भाऊसाहेब विकास आद्रट,कार्यकर्ते ग्रामस्थ,संजय कोडलकर,बाबा मोठे,भाऊसाहेब वाघमोडे, वैभव डफळ,अमोल पाटील,दादा पाटील,राहुल पाटील,दिनेश भोसले, बजरंग ढोबळे, हनुमंत गोरे,कृष्णा डोळे,विष्णू गोरे,आदी मान्यवर पहिल्या दिवशी उपस्थित होते.तर दुसऱ्या दिवशी 5 जून रोजी भाजपचे नेते आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील,आमदार राम सातपुते यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.यावेळी गणपतराव वाघमोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माजी सभापती सुभाष कुचेकर, शिवामृत दुध संघांचे व्हा.चेअरमन सावता ढोपे,पंचायत समिती उपसभापती प्रतापराव पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, किशोर सूळ, संतोष महामुनी,,राहुल वाघमोडे,मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियता ढेरे साहेब,, विराज पाटील साहेब,रामकाका दाते,शिवाजी गोरे, हनुमंत पाटील,गोविंद पवार, हनुमंत कोडलकर,शंकर वाघमोडे,कृष्णदेव रणदिवे, अप्पासाहेब पवार, शंकर पाटील, दादा पाटील, संदीप गोरे, संतोष गोरे,पारसे साहेब, रामचंद्र पाटील,भानुदास मोटे, हनुमंत कुंभार व.. फोंडशिरस गावातील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.एकाच रस्त्याचे सलग दोन दिवस वेगवेगळ्या नेत्यांकडून उद्घाटन झाल्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.हे दोन वेळा उद्घाटन श्रेयवाद घेण्यासाठी होत असल्याचे बोलले जात आहे.दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून पाठपुरावा करून काम मंजूर केलं असल्याचा दावा केला जात आहे.अशाच प्रकारे काम पारदर्शक होण्यासाठी काम पूर्ण होईपर्यंत दोन्ही पक्षातील नेत्यांनी पाठपुरावा करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.