पिरळे येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

पिरळे येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

ग्रामपंचायत पिरळे तालुका माळशिरस येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.6 जून हा संपूर्ण जगभर शिवराज्याभिषेक दिवस म्हणून साजरा केला जातो 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावरती राज्याभिषेक मोठ्या थाटात संपन्न झाला.आज त्या राज्याभिषेकाला 407 वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने शासनाने पहिल्यांदाच सार्वत्रिक  शिवस्वराज्य अभिषेक सोहळा  दिन करण्याचा निर्णय घेतला. तसा 12 मे रोजी शासन निर्णय काढण्यात आला आहे.याच धर्तीवर पिरळे येथे मोठ्या उत्साहात शिवस्वराज्य राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच अलका रामलिंग नरोळे,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या वतीने स्वराज्यभगवाध्वज लावून मानवंदना देण्यात आली व महाराष्ट्र गीत व सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले.तसेच यावेळी घरोघरी जाऊन कोरोना रुग्णांची माहिती व काळजी घेणारे आशा स्वयंसेविका यांचा शिवस्वराज्य व पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष देऊन ग्रामपंचायत यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच उद्योजक सामाजिक कार्यकर्ते संदीपसेठ नरोळे,उमेश खिलारे, संदीप वाघ, शिवाजी लवटे ,दादासाहेब शिंदे, दत्तात्रेय लवटे, अजित खंडागळे जि. प.शाळा पिरळे मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर,ढवळे सर, मुलानी सर, खरात सर ,सुप्रिया शिवगुंडे मॅडम व इतर शिक्षक, आशा स्वयंसेविका सुवर्णा शिंदे,मंदाकिनी माने,पुष्पा पैलवान,तसेच ग्रामसेवक रमेश जमदाडे ,ग्रामपंचायत कर्मचारी अनिल वाघमोडे आप्पासाहेब खिलारे, विश्वास बनकर,तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

पिरळे येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

You may have missed