विकास दादा धाईंजे यांनी वाढदिवसानिमित्त 300 कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-
आंबेडकरी चळवळीचे नेते माळशिरस चे माजी सरपंच विकास दादा धाईंजे यांनी नेहमीप्रमाणे स्वतःचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून तीनशे कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले.विकास दादा धाईंजे हे माळशिरस तालुक्यातील लोकप्रिय व्यक्तीमत्वा असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात 2019 ला महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.तेव्हा महाराष्ट्र शासनाने चारा छावण्या उभ्या केल्या होत्या त्या चारा छावण्यातील शेतकऱ्यांना वाढदिवसानिमित्त एक महिना जेवण देण्यात आले होते.तसेच 2020 ला देशा पुढे कोरोना चे संकट उभे राहिले तेव्हाही त्यांनी अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मदतीने रक्तदान शिबिरे घेतली होती. यावेळी जवळपास 400 ते 500 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोना काळात अनेक गरीब पेशंटना रुग्णालयात बेड उपलब्ध करून दिले. ग्रामपंचायत 15 टक्के निधीमधून महाराष्ट्रभरातील अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडले व महाराष्ट्रभर माळशिरस पॅटर्न राबविला.मिनी ट्रॅक्टर ची योजना सोलापूर जिल्ह्यायात प्रभावीपणे राबवून माळशिरस तालुक्यातील 170 कार्यकर्त्यांना मिनी ट्रॅक्टर मिळवून दिले.माळशिरस नगर पंचायत येथील तीन टक्के अपंगाचा निधी अपंगांनाा मिळवूून दिला.अनेक गरीब पीडितांच्या मदतीला विकास दादा धावून जात असतात. तसेच त्यांना अनेक सामाजिक संघटनांकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. अतिवृष्टी व पूर परिस्थिती काळात देशमुुख वाडी, कुरबावी, एकशिव,मळवली पुरात नुकसान झालेल्या लोकांना मदत केली आहे. याहीवर्षी कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तीनशे कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूच्या किटचे व वाटप केले.या वाटपाच्या कार्यक्रमास माळशिरस चे माजी सरपंच राष्ट्रवादीचे नेते तुकाराम देशमुख,नगरसेवक मारुती देशमुख,भाजपा नेते पांडुरंग देशमुख,नगरसेवक थोरात नाना, पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पश्चिम महाराष्ट्र चे नेते दयानंद बापू धाईंजे, एन.डी.एम.जे.चे राज्य सचिव वैभव गीत, रिपाई तालुकाध्यक्ष धनाजी पवार,प्रदीप धाईंजे,गवई गटाचे दत्ता सावंत ,श्रीकांत सावंत ,बुवानाना धाईजे,रमेश धाईजे, रंजीत धाईंजे तसेच माळशिरस, सिद्धार्थनगर व पंचक्रोशीतील ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच जून महिन्यामध्ये ज्या कार्यकर्त्याचा वाढदिवस होता त्या कार्यकर्त्यांचा वाढदिवस येथे साजरा करण्यात आला.