एन डी एम जे शिष्टमंडळाची कोरोना प्रादुर्भाव संदर्भात बारामती प्रांताधिकारी व इंदापूर तहसीलदार यांच्याशी महत्वपूर्ण चर्चा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या शिष्टमंडळ तसेच बारामती प्रांताधिकारी व इंदापूर तहसीलदार यांच्याशी महत्वपूर्ण चर्चा केली
1)कोरोना कोविड 19 या विषाणूचे संक्रमण झाल्यास सर्व जाती धर्माच्या नागरिकांना अंगीकृत रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळावेत.2) रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या हॉस्पिटल ची मान्यता रद्द करून गुन्हे दाखल करावेत3) सर्व जाती धर्मांच्या नागरिकांच्या घरकुलांना गायरान व गावठाण मधील शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी4) सर्व जाती धर्मांच्या नागरिकांची शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमानुकुल करावीत.बारामती व इंदापूर तालुक्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी चार मागण्यांकरिता बारामती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व इंदापूर तहसीलदार अनिल ठोंबरे यांची नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) संघटनेच्या पदाधिकारी यांच्याशी इंदापूर तहसील कार्यालयात बैठक संपन्न झाली.सर्व विषयांवर सखोल चर्चा झाल्यानंतर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी इंदापूर तहसीलदार व संबंधित विभागप्रमुख यांना तत्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या.यावेळी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते, इंदापूर तालुका अध्यक्ष शिवाजी बनसोडे,व इतर कार्यकर्ते हे उपस्थित होते.


