देशात दलितांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात काँग्रेस नेते डॉ.नितिन राउत यांनी दिल्ली येथे रणशिंग फुंकले

देशात दलितांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात काँग्रेस नेते डॉ.नितिन राउत यांनी दिल्ली येथे रणशिंग फुंकले

दिल्ली येथे दलित अत्याचाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान दिल्ली जंतर मंतर येथे मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत
काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल जी गांधी आंदोलनात सहभागी होऊन मार्गदर्शन करताना

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क दिल्ली संदेश भालेराव-

दिनांक १२ ऑगस्ट २०२१ रोजी अखिल भारतीय कॉँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री ना.डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वात दिली येथील जन्तर मंतर येथे अॅट्रॉसिटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी करीता संसद घेराव महमोर्चा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. नितिन राउत यांनी आज दिल्ली येथे दलितांवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या विरोधात रणशिंग फुंकले. राहुल गांधी यांच्या समवेत विचारमंचावरून त्यांनी म्हटले कि “मोदी सरकार ची मानसिकता दलित विरोधी आहे. त्यांना दलितांच्या मुली या देशाच्या मुली वाटतच नाही. त्यामुळे दलित मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनांमध्ये ते मुग गिळून गप्प बसतात. परंतु आम्ही आंबेडकरवादी जनता न्यायासाठी आजन्म संघर्ष करणार.”यावेळी अखिल भारतीय कॉँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा. राहुल गांधी यांनी उपस्थतांना संबोधित करत दलितांनी या देशात कोणालाही घाबरण्याचे कारण नाही, काँग्रेस पक्ष त्यांच्या न्याय हक्काच्या लढ्यात
सदैव सोबत असेल असे म्हटले.

अखिल भारतीय कॉँग्रेस पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री कुमारी शैलजा, केंद्रीय सचिव तथा तामिळनाडू प्रभारी डॉ.सिरिवेल्ला प्रसाद, अनेक खासदार आणि आमदार सह काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मा.मनोज बागरी, केंद्रीय सदस्य रवींद्र दळवी, राज्यअध्यक्ष मा.विजय अंभोरे यांच्या सह देशातील व महाराष्ट्र राज्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.दिल्लीच्या चिमुरड्या दलित मुलीचे सामूहिक बलात्कार व हत्या, हाथरस येथील अल्पवइन दलित मुलीवरील सामूहिक बलात्कार असेल किंवा महाराष्ट्रातील खैरलांजी सारखे हत्याकांड या विरुद्ध एकजूट होण्या करिता आणि ॲट्रॉसिटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी करीता सर्व पोट-जातीभेद, पक्षभेद किंवा मतभेद विसरून सर्व दलित समाजाने एकत्रित संघर्ष करणे ही काळाची गरज असल्याचे” मत अॅट्रॉसिटी कायद्याचे तज्ञ एड. डॉ. केवल उके यांनी व्यक्त केले.

हजारोंच्या संख्येने जनसमुदाय सहभागी
दलित अत्याचार पीडितांच्या न्याय हक्कासाठी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चे संचालक एडवोकेट डॉक्टर केवल उके साहेब आंदोलनात सहभागी

या हल्लाबोल मोर्च्यात महाराष्ट्र राज्यातून अनुसूचित जाती विभागाचे हजारो पदाधिकारी व दलित समाजाच्या अनेक संस्था-संघटना यांनी जाहीर पाठिंबा देवून हजारोच्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

You may have missed