नातेपुते येथे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त पाचशे गरिकांना लसीकरण

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा बाबाराजे देशमुख यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शनिवार दिनांक १४ ऑगस्ट रोजी नातेपुते शहरातील पाचशे नागरिकांना सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस देण्याचा सामाजिक उपक्रम मालोजीराजे मित्र मंडळाच्या वतीने घेण्यात आला. या उपक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून  डॉ.एम.पी. मोरे, एस.एन.डी स्कूल चे चेअरमन मालोजीराजे देशमुख, माळशिरस प. स. सदस्य माऊली पाटील, धैर्यशील देशमुख, अमरशील देशमुख, नाथाजीराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, विरेंद्र दावडा, संतोष काळे, डॉ. सागर गांधी, डॉ. वर्धमान दोशी, महेश शेठे, अर्जुन जठार, वामन पलंगे, डॉ. नरेंद्र कवितके,उदयोजक अतुल बावकर, दशरथ ठोंबरे, गणेश उराडे,अजय भांड, संदिप ठोंबरे, भारत साळवे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते उद्घाटन घेण्यात आले. यावेळी बोलत असता मालोजीराजे देशमुख म्हणाले की ,गावातील चाळीस टक्के लोकांचे लसीकरण राहिले आहे कोरोना पूर्ण मुक्त करायचा असेल तर शंभर टक्के लसीकरण करणे गरजेचे आहे. शहरातील सर्व तरुण एकत्र येऊन जे नागरिक वंचित राहिले आहेत अशा पाचशे नागरिकांचा शोध घेऊनच द्यायचा प्रयत्न केला. गावातील विविध पक्षाचे संघटनेचे लोक याठिकाणी असतात त्यांचे राजकीय मत विचार वेगवेगळे असू शकतात परंतु जेव्हा गावावर संकट येते समाजकार्याची गरज असते तेव्हा राजकीय पक्ष संघटना बाजूला ठेवून सर्व संकटाला सामोरे जाण्यासाठी, समाजकार्यासाठी एकत्र येतात व समाजकार्याची भावना मनात जपतात असे मत एस.एन.डी. स्कूल चे चेअरमन मालोजीराजे देशमुख यांनी व्यासपीठावर बोलत असताना व्यक्त केले. कार्यक्रमासाठी नातेपुते ग्रामस्थ तसेच मालोजीराजे देशमुख मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते सुत्रसंचाल आशा टोमके यांनी केले तर आभार अॅड शिवाजीराव पिसाळ यांनी आभार यांनी मानले.

लसीकरण करताना लाभार्थ्यांस समवेत सामाजिक कार्यकर्ते मालोजीराजे देशमुख

You may have missed