खुंटबावी-निटवेवाडी घाटात पती-पत्नीला आडवून १ लाख ५ हजार किमतीच्या दागिन्यांची लूट,नातेपुते पोलिसात गुन्हा दाखल


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे: नातेपुते जानकर वस्ती येथील महादेव दादा जानकर ( वय ४२ ) व्यवसाय शेती हे व त्यांची पत्नी सविता दादा जानकर भालवडी तालुका माण , जि.सातारा येथून दि .३१ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांची स्वःताची हिरो – होंडा मोटार सायकल नंबर एम.एच. ४५ यु ९ ३२८ या गाडीवरून सायं . ५ वाजण्याच्या सुमारास लग्न सोहाळा उरकून नातेपुतेकडे येत असताना खुटभावी ते निटवेवाडी ता.माळशिरस या घाटातील रोडवरील वळणावर १७ ते १८ वयोगटातील तीन मुलांनी त्यांची मोटार सायकल आडवी लावूण व मारहाण करण्याची भिती दाखवूण माझ्या गळ्यातील सोन्याचा बदाम तसेच पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे असे एकूण १ लाख ५ हजार किंमतीचे सोन्याचे दागिणे घेऊन तीन मुले मोटार सायकलवरून फरार झाली . याबाबत सविस्तर माहिती अशी की , महादेव दादा जानकर ( वय ४२ ) वर्ष , रा.जानकर वस्ती , नातेपुते , ता.माळशिरस . हे दि . ३१ ऑगस्ट २०२१ रोजी मेहुणे लक्ष्मण तात्याबा शेंडगे रा.भांब , ता.माळशिरस यांच्या मुलीचे लग्न भालवडी , ता.माण , जि.सातारा येथे दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास असल्याने लग्नाकरीता मी व माझी पत्नी सविता दादा जानकर असे दोघे जण सकाळी १० वाजता घरातून माझी हिरो कंपनीची मोटार सायकल नंबर एम.एच. ४५ यु ९ ३२८ या गाडीवरून लग्नास गेलो होतो . तेथे लग्न सोहळा उरकून सायं . ४ वाजता नातेपुतेकडे येण्यासाठी भाळवणी , खुटभाव , निटवेवाडी , फडतरी यामार्गे निघालो असता , सायं . ५ वाजण्याच्या सुमारास खुटभावी ते निटवेवाडी या घाटातील रोडवरील दुसरया वळणाच्या उतारावर आलो असता , यावेळी निटवेवाडी कडून एका मोटार सायकलवर तीन मुले बीगर मास्क घातलेले आम्हास पास करून खुटभावी रोडने पुढे जाऊन परत फिरून माघारी येऊन त्यांनी मोटार सायकल माझ्या मोटार सायकलच्या आडवी लावली . म्हणून मी मोटार सायकल उभा केली . त्यांना पाहिले , ते तीन मुले अनोळखी होते . तीन मुलांपैकी दोन मुले सतरा ते अठरा वयो गटातील अंगाने सडपातळ , चेहरा उभट , डोकीस बारीक केस , अंगात लाल रांगाची कपडे व जीन्स पँन्ट असे होते व तीसरा मुलगा हा वयाने २२ ते २३ , अंगाने सडपातळ , चेहरा उभट , अंगात पिवळ्या रंगाचा शर्ट , काळ्या रंगाची नाईट पँन्ट असे होते . तीघे जन उतरुन आमच्या जवळ आले , त्यापैकी तीसरया मुलाने माझ्या गळ्यातील सोन्याचा बदाम मला माघीतला . मी नकरा दिला असता , मला मारण्यास हात उगरला तो हात मी धरला असता , त्यावेळी इतर दोघांनी पत्नीच्या गळ्यातील असलेले सोन्याचे
दागिणे यामध्ये एक तोळ्याचा लक्ष्मी हार , आर्ध्या तोळ्याची बोरमाळ , एक तोळ्याची मण्याची माळ व एक तोळा मण्याचे नेकलेस असा १ लाख ५ हजार किंमतीचे दागिणे मारहाण करण्याची भिती घालून , बळजबरीने तोडून घेतले व ते खुटभावी रोडने मोटार सायकलवर निघून गेले . ती मोटार सायकल जुनी असल्याने पुढे – मागे मोटार सायकलवर नंबर नव्हता . मी व पत्नी घरी निघून आलो . घडलेल्या प्रकारामुळे आम्ही दोघे घाबरून गेलो होतो.मोठा भाऊ आप्पा दादा जानकर यांना घडलेला प्रकार सांगून त्याच्या सोबत नातेपुते पोलिस ठाणे येथे तीन अज्ञात इसमा विरूद्ध तक्रार दाखल केली असून सदर गुन्ह्याचा तपास नातेपुते पोलिस ठाण्याचे एपीआय मनोज सोलवनकर करीत आहेत.लवकरच दरोडेखोरांचा बंदोबस्त करणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

You may have missed