बोरगाव माळेवाडी प्रकरणासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या उपसचिवांचे तात्काळ कारवाईच्या सूचना, मंत्रालयीन आदेश जारी

बोरगाव माळेवाडी प्रकरणासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या उपसचिवांचे तात्काळ कारवाईच्या सूचना, मंत्रालयीन आदेश जारी
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कबोरगाव-माळेवाडी ता.माळशिरस येथील मातंग समाजबांधवांचे प्रेत स्मशानभूमीत जाळण्यासाठी मज्जाव करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते व ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदेश भालेराव यांनी जय भिम,जय लहुजी या घोषणा देत मंत्रालयात जाऊन आक्रमक भूमिका घेत सामाजिक न्याय विभागाचे अप्पर मुख्य सचिव अरविंद कुमार यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले होते.संघटनेने केलेल्या मागण्यांवर तात्काळ कारवाई करणेबाबत आदेश महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अपर मुख्य सचिव गृह विभाग मंत्रालय, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य,आयुक्त समाज कल्याण पुणे,जिल्हाधिकारी सोलापूर, अप्पर जिल्हादंडाधिकारी सोलापूर,अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सोलापूर, यांना सदर घटनेची संवेदनशीलता व  गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास त्वरित सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव यांनी दिनांक 30 ऑगस्ट 2021 रोजीच्या पत्रानुसार केल्या आहेत.मंत्रालयातून एवढ्या जलद कारवाई होण्याची पहिलीच वेळ असल्याने पीडित साठे कुटुंबास सर्वतोपरी मदत करणारे वैभव गिते व संदेश भंडारे तसेच नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या कामाचे कौतुक राज्यभर होत आहे.

You may have missed