अंत्यविधी रोखण्याच्या गुन्ह्यात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने मागितला अहवाल
अंत्यविधी रोखण्याच्या गुन्ह्यात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने मागितला अहवाल
एन.डी.एम.जे संघटनेच्या निवेदनाची आयोगाने गंभीर दखल घेतली
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क– संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना बोरगाव-माळेवाडी ता.माळशिरस जि.सोलापूर येथील मातंग बांधवांना अंत्यविधी स्मशानभूमीत करण्यास अडथळा आणणाऱ्या आरोपींवर कडक कारवाईसह इतर 20 मागण्यांचे निवेदन राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगास सादर करण्यात आले.पीडित दशरथ साठे यांच्यासह नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या महिला राज्य संघटक पंचशीलाताई कुंभारकर यांनी माळेवाडी-बोरगाव येथील मानवतेला काळिंबा फासणाऱ्या घटनेचे गंभीर्य आयोगाच्या निदर्शनास आणले.राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने याची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक सोलापूर यांच्याकडून 15 दिवसात अहवाल मागीतला असून अहवाल प्राप्त न झाल्यास आयोगास प्राप्त अधिकारांचा उपयोग करण्यात येईल असे आयोगाच्या पत्रात म्हंटले आहे.या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून अनेक राजकीय पक्ष विविध संस्था-संघटनांनी घटनेचा निषेध करून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.तरीसुद्धा आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.

