मोखाड्यातील आदिवासी महिला शिवणकला वर्गास राज्य महिला बालविकास मार्गदर्शक समितीचे सदस्य ॲड.डॉ.केवल उके यांनी दिली सदिच्छा भेट..
मोखाड्यातील आदिवासी महिला शिवणकला वर्गास राज्य महिला बालविकास मार्गदर्शक समितीचे सदस्य ॲड.डॉ.केवल उके यांनी दिली सदिच्छा भेट..
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पालघर संदेश भालेराव– दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी,”द व्हिजन ग्रुप” संस्थेच्या मोखाड्यातील आदिवासी महिला शिवणकला वर्गास नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस (एन.डी.एम.जे.) संघटनेचे राज्य महासचिव तथा राज्य महिला बालविकास मार्गदर्शक समितीचे सदस्य ॲड.डॉ.केवल उके यांनी सदिच्छा भेट दिली.
पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे “द व्हिजन ग्रुप” चे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या माध्यमातून आदिवासी महिलांना उपजीविकेचे साधन निर्माण करून देण्या करिता मोफत शिवणकला वर्ग चालविण्यात येते. या अभिनव उपक्रमाचे सर्वांनी कौतुक करून पुढील वाटचालीस सदिच्छा दिली.




यावेळी नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस (एन.डी.एम.जे.) संघटनेचे मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष बंदिश सोनावने, प्रदेश सचिव शशिकांत खंडागळे, कल्याण अध्यक्ष नितेश गायकवाड, पालघर अध्यक्ष चेतन शेवाळे, उपाध्यक्ष हेमंत शिंगडे, सचिव सुरेश वळवी, त्र्यंबकेश्वर अध्यक्ष पांडुरंग पालवे, सचिव प्रकाश गोडे व मोखाडा तालुका सचिव मयूर पागी इत्यादी उपस्थित होते.