नातेपुते येथे मालोजीराजे देशमुख मित्र परिवाराच्या वतीने डेंगू व चिकनगुनिया प्रतिबंधात्मक औषध फवारणी
नातेपुते येथे मालोजीराजे देशमुख मित्र परिवाराच्या वतीने डेंगू व चिकनगुनिया प्रतिबंधात्मक औषध फवारणी


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)
नातेपुते तालुका माळशिरस येथील कोरणा प्रादुर्भाव सुरू असतानाच त्यामध्ये डेंगू चिकनगुनिया साथीच्या रोगांची भर पडली आहे.या रोगांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक योजना म्हणून मालोजी देशमुख मित्र परिवाराच्या वतीने औषध फवारणीचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.पी.मोरे,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.सध्या नातेपुते येथे डेंगू,चिकनगुनियाची साथ सुरू असून रुग्ण संख्या वाढत आहे.यावर प्रतिबंध करण्यासाठी मालोजीराजे देशमुख मित्रपरिवार यांच्या वतीने डेंगू व चिकनगुनिया प्रतिबंध औषध फवारणी करण्यात आली.या स्तुत्य उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.कार्यक्रमास डॉक्टर एम.पी.मोरे,माजी जि.प.उपाध्यक्ष बाबाराजे देशमुखमाजी सरपंच ऍड भानुदास राऊत,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, ऍड पिसाळ,रावसाहेब पांढरे मभाऊ देशमुख, महेश शेटे,युवा नेते मालोजीराजे देशमुख,उपसरपंच अतुल पाटील,पं.स.सदस्य,माऊली पाटील,डॉक्टर नरेंद्र कवितके,उद्योजक अतुल बावकर,सिकंदर मुलानी, तसेच ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन मालोजीराजे देशमुख मित्रपरिवार यांच्यावतीने करण्यात आले होते.