आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- पिरळे तालुका माळशिरस येथे आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांचे 230 वी जयंती निमित्त पिराळे येथे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे अध्यक्ष अजित शिरतोडे व मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने वह्या वाटप करण्यात आल्या यावेळी संपादक प्रमोद शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास पिरळे गावचे आजी-माजी सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील तसेच ज्ञानदेव शिंदे कैलास निकम,मुख्याध्यापक नानासाहेब शिंदे सर ,उमेश भैय्या खिलारे,भाऊसाहेब भिसे सर भाजपा ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष सुनील बनकर,हनुमंत बुधावले सुदाम बुधावले,बाबुराव बुधावले, अंकुश बुधावले ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली जिल्ह्यात व विविध ठिकाणी सुद्धा पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.










