आदिवासींच्या विविध मागण्याकरिता नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेचा बेलापूर सिडको भवनावर भव्य मोर्चा..
नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेचा सी.बी.डी.बेलापूर सिडको भवनावर आदिवासी वाडी बचाव मोर्चा..

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नवी मुंबई संदेश भालेराव– दिनांक १६ डिसेंबर २०२१ रोजी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेचे राज्य महासचिव ॲड.डॉ.केवल उके यांच्या नेतृत्वात सी.बी.डी. बेलापूर सिडको भवनावर आदिवासिंच्या विविध मागण्याकरिता शेकडो कार्यकत्यांसह भव्य मोर्चा काढण्यात आला.

आदिवासी समुदाय हा येथील जल, जंगल जमिनीचा मूळ मालक असून सुद्धा विकास आराखडयाच्या नावाखाली आदिवासींच्या वाड्या-वस्त्या या जमीनदोस्त केल्या जात आहेत. तसेच गावठाण प्लॉट असलेल्या व अनादी काळापासून आदिवासी राहत असलेल्या पेठाली-तळोजा, पेंधर आणि पापडीचा पाडा या पनवेल तालुक्यातील आदिवासी वस्त्यांच्या जागेवर सिडको प्रशासनाने प्लॉट पडून धनदांडग्या बिल्डरांच्या घश्यात घातलेले आहेत. सिडको प्रशासनाला यासंदर्भात वेळोवेळी निवेदन देवून सुद्धा अद्याप काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्याकरिता नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे.) संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला असे ॲड.डॉ.केवल उके यांनी सांगितले आणि सर्व मागण्या येत्या २५ दिवसात मंजूर न झाल्यास आझाद मैदान येथे १०००० दलित-आदिवासींचा प्रचंड मोर्चा काढून व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असे आव्हान केले.

तळोज्यातील मूळनिवासी आदिवासी बांधव यांच्यावर सिडको प्रशासनाने जातीय द्वेशातून अन्याय अत्याचार करून त्यांचे वडिलोपार्जित असलेली जमीन धनदांडग्या बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट रचत असून आदिवासींना बेघर करण्याचे व त्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मूलभूत सोई-सुविधांपासून वंचित ठेवण्याचे काम सिडको करीत आहे असे मत संघटनेच्या कोकण प्रदेश उपाध्यक्षा सौ.शोभाताई जाधव यांनी व्यक्त केले.

एन.डी.एम.जे. कोकण प्रदेश अध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी सिडको प्रशासनाला इशारा दिला आहे की जर आठ दिवसांत सर्व मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही आपल्या विरोधात उपोषणाला बसू तसेच वेळ आली तर आत्मदहन ही करू याची प्रशासनाने दाखल घ्यावी असा इशाराही दिला.
नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिसचे राज्य निरीक्षक बी पी लांडगे यांनी आक्रमक भूमिका घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच पेठाली, पेंधर आणि पापडीचा पाडा या टळोजा व पनवेल तालुक्यातील आदिवासी वस्त्यांच्या जागेवर सिडको प्रशासणाने पाडलेले प्लॉट रद्द करणे, आदिवासी गावठाण जाहीर करणे, नागरी सुविधा व शिक्षण पुरविणे, विकास आराखड्यात बाधित होणारे आदिवासींची घरे तोडू नये, आदिवासी वाड्यामध्ये समाज मंदिर व शाळा बांधण्यात यावयात इत्यादी मागण्यांचे निवेदन मा.अप्पर जिल्हाधिकारी श्री.सतिश शेंडगे यांना दिले.
सदरील आदिवासी वाडी बचाव मोर्चात संघटनेचे राज्य निरीक्षक बि.पी.लांडगे, कोंकण प्रदेश अध्यक्ष सुभाष गायकवाड, उपाध्यक्ष शोभा जाधव, ठाणे मुंबई प्रदेश अध्यक्ष बंदिश सोनावणे, पनवेल तालुकाध्यक्ष संजय सोनावणे, सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव, स्थानिक कार्येकर्ता राम वाघे, बामा कातकरी, मच्छिंद्र नाईक, संजय वनसे, मारुती वाघमारे, देवकी वाघे, पी.आर.पी. जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, पत्रकार पंचशील शिरसाट व भूमिका जाधव, चंद्रकांत जाधव यांच्यासह शेकडो आदिवासी पिडीत व कार्यकर्ते उपस्थित होते.